actor sonu sood Team esakal
मनोरंजन

दुसऱ्या दिवशीही सोनु सूदच्या घरी आयकर विभागाची धाड

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनु सूदची (actor sonu sood)अडचण आणखी वाढताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनु सूदची (actor sonu sood)अडचण आणखी वाढताना दिसत आहे. काल त्याच्या घरी आणि कार्यालयावर आय़कर विभागानं सर्वे करण्याच्या निमित्तानं धाड टाकली होती. आता पुन्हा त्याच्या घरी आयकर विभागाची टीम घरी आली आहे. त्यामुळे सोनुच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील सोनुच्या घरी आयकर टीम आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या काळात सोनुच्या अडचणीत वाढ होणार का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. आपल्या मदतशील स्वभावामुळे प्रसिद्ध झालेल्या सोनुच्या घरी आयकर विभागाची धाड येऊ शकते यामुळे त्याचे चाहतेही भांबावून गेले आहे.

सोनुच्या अडचणी कमी होण्याचे काही नाव घ्यायला तयार नाही. सलग दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात आपली प्रॉपर्टी गहाण ठेवून लोकांना मदत केल्याच्या बातम्या सोनु सूदच्या बाबत व्हायरल झाल्या होत्या. आयकर विभागाचे अधिकारी दुसऱ्या दिवशी सोनु सूदच्या घरी पोहचले आहेत. काल पासून आयकर विभागाच्या टीमनं सोनु सूदच्या घरी तळ ठोकला आहे. आता पर्यत विभागाच्या वतीनं सोनु सूदच्या सहा ऑफिसवर छापे मारले आहेत. छापेच्या नावाखाली आपण सर्वे केला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामधून सोनु सूदचे बॅक अकाउंट्स, खर्चाशी संबंधित सर्व डेटा तपासण्यात आला होता.

सोनू सूद कोरोनाकाळात केलेल्या आपल्या सामाजिक कार्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. कोरोना काळात अचानकपणे लावलेल्या लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मजूरांच्या स्थलांतरणावेळी सोनू सूदने त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. या काळात मदतीसाठी सोशल मीडियावरुन लोक सोनू सूदकडे मागणी करत होते. आणि सोनू सूद ती पूर्ण करत होता. त्यामुळेच त्याचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT