अनाथ मुलांच्या मदतीला सोनु सूद, चाहत्यांनाही केलं आवाहन...

अनाथ मुलांसाठी सोनुनं मदत करण्याचा निर्णय घेतला आहे...
sonu sood
sonu sood Team esakal

मुंबई - बॉलीवूड अभिनेता (bollywood actor) सोनु सूद (sonu sood) त्याच्या मदतशील स्वभावासाठी प्रसिध्द आहे. त्यानं यापूर्वी हजारो लोकांना मदतीचा हात दिली आहे. सोशल मीडियावर त्याच्याकडे मदतीची मागणी करणारे शेकडो मेसेज येत असतात. अशावेळी सोनु त्यांना जमेल तसे मदत करतो आहे. अनाथ मुलांसाठी सोनुनं मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. कोरोनामुळे हजारो मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. (sonu sood appeals to people to help children who lost both parents during pandemic said life is so unfair)

सोनु त्याच्या अभिनयापेक्षाही मदतशील उपक्रमांमुळे जास्त लोकप्रिय आहे. त्याचा सोशल मीडियावर (social media) फॅन फॉलोअर्सही (fan follwers) मोठा आहे. कोरोनामध्ये त्यानं अनेकांना मदतीचा हात दिला आहे. मदत हवी असणारे लोक त्याला व्टिटरवर मेसेज करतात. सोनु त्यांना मदत करतो. असेही अनेकदा दिसून आले आहे. आता त्यानं कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याच्या या उपक्रमाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

एका मुलीनं त्याला आपण अनाथ (orphan) झालो आहोत याची वेदनादायी गोष्ट सांगितली. त्यामुळे त्यानं अशा मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा दिवसांपूर्वी त्या मुलीचे आई वडिलाचं कोरोनानं निधन झाले. त्यामुळे ती अनाथ झाली आहे. त्या मुलीनं सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सोनुनं आपल्या सोशल मीडियावरुन अनाथ मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

sonu sood
सुनील दत्त यांचे मृत्यूपूर्वी परेश रावल यांना पत्र...
sonu sood
आमच्याजवळ पुरावे, पर्ल वी पुरी प्रकरणावर डीसीपींचे एकताला उत्तर...

त्यानं लिहिलं आहे की, मी ज्यावेळी त्या लहान मुलीची स्टोरी ऐकली तेव्हा मला वाईट वाटले. नुकतचं तिच्या आई वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे ती मुलगी एकटी पडली आहे. मी लोकांनाही आता असे आवाहन करतो की त्यानं पुढे येऊन अशा मुलांना मदत करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com