मनोरंजन

'खुदा हाफिज' चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज; रोमान्स-अॅक्शन-थ्रिलरचे हटके मिश्रण

संतोष भिंगार्डे



मुंबई ः फोर्स, जंगली, कमांडो यांसारख्या चित्रपटातून अॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण केलेला अभिनेता विद्युत जामवाल याच्या 'खुदा हाफिज' या आगामी चित्रपटाचा दमदार ट्रेलर काल रिलीज झाला. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोमँटिक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये विद्युत एका असहाय पतीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याची पत्नी बेपत्ता झाली आहे. या ट्रेलरमध्ये विद्युतने आपल्या अभिनयाने आपले लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'खुदा हाफिज' ही एक अशी जोडप्यांची कहाणी आहे ज्यांनी उत्तम करियरच्या शोधात परदेशात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात विद्युत समीरची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर शिवालिका नरगिसच्या म्हणजेच समीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.  ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे, नरगिस रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता होते. बेपत्ता होण्याआधी तिचं फोनवर शेवटचं बोलणं समीरशी होतं. एका असहाय्य पतीप्रमाणेच समीर आपल्या पत्नीचा शोध घेण्यास सुरवात करतो आणि नंतर तिला शोधण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं हे या सिनेमात दाखवलं आहे.

     'कमांडो' सारख्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन  दाखविणारा विद्युत या सिनेमातही एका वेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. तसंच अॅक्शनसोबत या चित्रपटातील या जोडप्यामधील प्रेमळ क्षणही लक्ष वेधून घेतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन फारूक कबीर यांनी आहे.  'रेड', 'स्पेशल 26' आणि 'ओमकारा' सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे कुमार मंगत पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.  'खुदा हाफिज' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
---------------------------------------------------

Edited By Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT