मुकेश छाबरा म्हणतात; 'दिल बेचारा'ची स्क्रीप्ट न वाचताच सुशांत सिंहने दिला होकार

संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क
Wednesday, 22 July 2020

मला वाटते की सुशांत आजही माझ्या मागे उभा आहे....सुशांतच्या आठवणींमध्ये दिग्दर्शक मुकेश छाबरा रमले होते आणि आपल्या भावनेला वाट करून देत होते.

मुंबई ः माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने मोठा विक्रम केला आहे. हे सगळे सुशांतच्या लोकप्रियतेमुळे झाले आहे. चित्रपट प्रदर्शित होतोय याचा एकीकडे आनंद आहेच पण दुसरीकडे दुःख अधिक आहे. कारण माझा छोटा भाऊ आता हा चित्रपट पाहण्यास नाही आहे. मला वाटते की सुशांत आजही माझ्या मागे उभा आहे....सुशांतच्या आठवणींमध्ये दिग्दर्शक मुकेश छाबरा रमले होते आणि आपल्या भावनेला वाट करून देत होते.

प्रभाससोबत काम करुन दीपिका बनणार सगळ्यात महागडी अभिनेत्री? घेतेय इतके कोटी रुपये..

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा येत्या शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. सुशांतच्या तमाम चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागलेली आहे. मुकेश छाबरा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. याबाबत म्हणाले, की सुशांतने मला त्याच्या पहिल्या चित्रपटा वेळी सांगितले होते की तू जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करशील तेव्हा त्या चित्रपटात मी नक्कीच काम करीन. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि सन २०१८ मघ्ये मी स्क्रीप्ट फायनल केली. त्यानंतर मी फॉक्स स्टार स्टुडिओला जाऊन भेटलो. त्यांनी चित्रपटाची निर्मिती करण्याचे निश्चित केले आणि त्यानंतर या चित्रपटाबद्दल सुशांतला सांगितले तर तो लगेच तयार झाला. विशेष म्हणजे सुशांतने स्क्रीप्ट न पाहताच त्याने होकार दिला. त्याने होकार दिल्यानंतर माझा आत्मविश्वास अधिक वाढला. जेव्हा आम्ही जमशेदपूरला शूटिंगसाठी गेलो तेव्हा सुशांतने स्क्रीप्ट मागितली.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत नानावटी रुग्णालयातून आली मोठी अपडेट; कुटूंबियांच्या आरोग्याबाबतही डॉक्टर म्हणाले...

स्क्रीप्ट न वाचताच तो माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्यास तयार झाला. माझ्यावर त्याचा किती विश्वास होता. मला त्याने दिलेला शब्द पाळला. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत सहसा असे होत नाही. पहिल्यांदा हो म्हणणार आणि नंतर काही तरी कारण देऊन नकार देणार. सुशांत असा कलाकार नव्हता. कमिटमेंटचा तो पक्का होता. माझा तो अत्यंत जवळचा मित्र आणि भाऊ होता. ९ जुलै २०१८ रोजी आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली.   या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक था राजा एक थी रानी..... अशा प्रकारचे संवाद आहेत. त्याबद्दल ते म्हणाले, की सुशांत सिंह हा हिंदी चित्रपटसृष्टीचा राजा होता. कमी वयामध्ये त्याने मोठी भरारी घेतली होती. आज माझा राजा नाही आहे. त्याच्याशिवाय आता मला जीवन जगायचे आहे. त्याचेच दुःख मोठे आहे.  

--------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Says Mukesh Chhabra; Sushant Singh said yes without reading the script of 'Dil Bechara'