actress disha pardeshi new album kanyakumari
actress disha pardeshi new album kanyakumari  sakal
मनोरंजन

अभिनेत्री दिशा परदेशी बनली 'कन्याकुमारी'.. ही आहे खास बात..

नीलेश अडसूळ

actress disha pardeshi : गायिका वैशाली सामंत (vaishali samant), नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर, गीतकार मंदार चोळकर, मिताली जोशी, चिनार-महेश यांचे संगीत अशा दिग्गज मंडळींनी एकत्र येत 'कन्याकुमारी' या दमदार अल्बमची निर्मित केली आहे. लग्न सोहळा हा विषय घेऊन यातील गाणी रचण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या अल्बमला चार चाँद लावले ते म्हणजे अभिनेत्री दिशा परदेशी हिने.. परिकथेत रमणाऱ्या, भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या एका कन्याकुमारीची लगीनघाई आपल्याला ‘व्हिडिओ पॅलेस’ निर्मित ‘कन्याकुमारी’ या मराठमोळया अल्बममधून पहायला मिळणार आहे. (vaishali samant new album) (vaishali samant new song) ( vaishali samant 'kanyakumari' album)

नुकताच या गीताचा प्रकाशन सोहळा पारंपारिक पद्धतीने दिमाखात संपन्न झाला. एका सुंदर गीताला मिळालेली उत्तम सूर, संगीताची साथ सोबत अप्रतिम छायांकन आणि नृत्यदिग्दर्शन यामुळे ही मराठमोळी ‘कन्याकुमारी’ नववधूच्या साजिऱ्या रुपात आपल्यासमोर अवतरली आहे. लगीनघरातील माहोल, पाहुण्यांची लगबग, बच्चेकंपनीची धमालमस्ती आणि नववधूच्या मनातील हूरहूर याचे सुरेख चित्रण या गीतामध्ये पहायला मिळणार आहे. दिशा परदेशी या सुंदर अभिनेत्रीवर हे गीत चित्रीत झाले असून तिला अक्षय वाघमारे या हँडसम अभिनेत्याची उत्तम साथ लाभली आहे.

(actress disha pardeshi new album kanyakumari)

मंदार चोळकर व मिताली जोशी यांचे शब्द, चिनार-महेश या संगीतकार जोडीची उत्तम चाल आणि त्याला वैशाली सामंत सारख्या सुरेल गायिकेचा स्वर यामुळे अद्भुत रसायन जुळून आले आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिने नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी अतिशय उत्तम सांभाळली आहे. अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं असून गुरु पाटील यांनी या गीताचे संकलन केले आहे.

'अतिशय कमी कालावधीत या गाण्यावर नृत्य करणं हा माझ्यासाठी एक टास्क होता. पण तो मी यशस्वीपणे पूर्ण केला आणि एक सुरेख गाणं करण्याची संधी मिळाल्याचा आनंद दिशा परदेशीने यावेळी व्यक्त केला. लग्नाची सगळी धमाल मस्ती या गाण्यातून दिसेल. मी स्वत: हे गाणं खूप एन्जॉय केल्याचं नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिने सांगितलं. हे गाणं करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना अभिनेता अक्षय वाघमारे यांनी लग्नाची एक सुरेख फिल्म पाहिल्याची अनुभूती प्रेक्षकांना या गाण्यातून मिळेल असं यावेळी सांगितलं. येत्या काळात प्रत्येक लग्नसोहळयात हे गीत नक्की वाजेल असा विश्वास ‘कन्याकुमारी’च्या टीमने व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICU मध्ये आजारी वडिलांसमोर लागले दोन मुलींचे लग्न, डॉक्टर-नर्स झाले वराती, नंतर... डोळे पाणावणारी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले! केंद्रीय गृहमंऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत घेतला परिस्थितीचा आढावा

SAKAL Impact : ..अखेर वेळेपूर्वीच व्हीपीयू वॅगन फलाटावर; निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी रेक दिल्लीकडे

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

SCROLL FOR NEXT