Adah Sharma On Buying SSR House:  Esakal
मनोरंजन

Adah Sharma: "मला माझ्या पद्धतीने..", सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी करण्याच्या बातम्यांवर अदानं सोडलं मौन

Adah Sharma On Buying SSR House: गेल्या काही दिवसांपासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे घर अदा विकत घेणार अशी चर्चा सुरु होती.

Vaishali Patil

Adah Sharma On Buying SSR House: अभिनेत्री अदा शर्मा ही द केरळ स्टोरी चित्रपटानंतर चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

अदा सोशल मिडियावरही खुप सक्रिय असते. त्यातच काही दिवसांपुर्वी अदा शर्मा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घराजवळ स्पॉट झाली होती. त्यानंतर अदा सुशांतचं घर विकत घेणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.

आता अदाने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अदा खरचं सुशांत सिंगचे घर विकत घेणार आहे का याबाबत ती नुकतीच एका मुलाखतीत स्पष्टपणे बोलली आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सुशांत सिंग राजपूतचे घर विकत घेतल्याच्या बातमीवर अदा म्हणाली, 'माझे घर मला मंदिरासारखे आहे, मी कुठे राहते याविषयी प्रत्येक वृत्तपत्र आणि फोनद्वारे याचा प्रचार व्हावा असं मला वाटत नाही.

मी लहानपणापासून माझ्या वडिलांच्या घरी पल्लई येथे राहत आहे. मी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला तरी मी अशा बातम्या जाहीर करणार नाही. मला ते माझ्या पद्धतीने शेअर करायला जास्त आवडेल.'

ती पुढे म्हणाली, 'तुम्ही जिथे राहता ते तुमचं घर आहे आणि ते माझ्यासाठी खूप वैयक्तिक आहे. लोकांना अंदाज लावू द्या, मी आता या रिपोर्टची पुष्टी करण्यासाठी वेळ घेईन.

अदा म्हणाली की, सध्या माझे लक्ष फक्त लोकांच्या हृदयात राहणं आहे. काही गोष्ट प्रत्येकाशी शेअर करावं की नाही ही माझी वैयक्तिक निवड आहे. मला वाटेल तेव्हा मी ही गोष्ट चाहत्यांना सांगू शकते. त्यामुळे कोणत्याही अफवांमुळे मला अस्वस्थ वाटत नाही.'

अदा पुढे म्हणते की तिला तिचे आयुष्य खूप खाजगी ठेवायला आवडते. ती म्हणाली, 'जेव्हा मी 'द केरळ स्टोरी'चे शूटिंग करत होते, तेव्हा कोणाला माहितही नव्हते. शूटिंग करत असताना मला कुणाचा फोन आला तर मी त्यांना या प्रोजेक्ट बद्दल काहीच सांगत नव्हती. मी स्पष्ट उत्तर देत नाही. जेव्हा प्रोजेक्ट्स रिलीज होणार असतात, तेव्हाच मी त्यांच्याबद्दल कोणाशीही बोलत असते.

आता या मुलाखतीत अदाने ती सुशांतचे घर विकत घेणार आहे की नाही याबाबत स्पष्ट वक्तव्य केलेले नसलं तरीही तिने या अफवांना नाकारलं देखील नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT