Vicky Kaushal’s taking blessings from a 60-year-old lady at dubai
Vicky Kaushal’s taking blessings from a 60-year-old lady at dubaiSAKAL

Vicky Kaushal: "तु माझा मुलगा..." साठ वर्षाची आजी फॅन! पुढे विकीने केलेल्या 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल

विकी कौशलच्या सॅम बहादूरचं दुबईमध्ये प्रमोशन सुरु असताना ही घटना घडली
Published on

विकी कौशल हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. विकी कौशलने आजवर मसान, मनमर्जिया, संजू अशा अनेक सिनेमांंमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. विकीचा अभिनय पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी आहे.

विकी आता लवकरच सॅम बहादूर सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सॅम बहादूर सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. अशातच एका प्रमोशनदरम्यान विकीला एक चाहती भेटली. आणि पुढे विकीने केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलंय. काय घडलंय बघा.

(Vicky Kaushal’s taking blessings from a 60-year-old lady at dubai)

Vicky Kaushal’s taking blessings from a 60-year-old lady at dubai
Prajakta Mali: 'म्हणून ती माझे केस विंचरते', प्राजक्ताचा व्हिडीओ व्हायरल, भाची म्हणते.. 'तुझ्या केसातला गुंता'

विकीला भेटायला आली ६० वर्षीयआजी, मग पुढे काय घडलं बघा

विकी सध्या सॅम बहादूरच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरत आहे. विकी नुकताच दुबईला गेला होता. त्यावेळी विकीला दुबईला भेटायला अनेक फॅन भेटायला आले होते.

विकी स्टेजवर उपस्थितांशी संवाद साधत होता त्यावेळी होस्टने विकीला त्याच्या एका फॅनची ओळख करुन दिली. एक ६० वर्षांची एक आजी थेट मुंबईतुन विकीला भेटायला आली होती.

विकी स्टेजवरुन खाली उतरला आणि...

विकी कौशलला जेव्हा कळलं तेव्हा त्याला भेटायला मुंबईतुन फॅन आलीय. तेव्हा तो फॅनला भेटायला स्टेजवरुन खाली उतरला. फॅन म्हणाली, "विकी, माझा मुलगा तुझ्यासारखा आहे." हे समजताच विकी आणखी पुढे गेला. आणि त्याने खाली वाकुन त्या फॅनचे आशिर्वाद घेतले.

विकीच्या या कृतीने सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याचं कौतुक केलं.

सॅम बहादुरची सर्वांना उत्सुकता

सॅम बहादुर या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख असे कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलंय.

सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. त्याची टक्कर रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com