मनोरंजन

बिकीनीतील व्हीडिओमुळे 'गोपी बहू' ट्रोल; नेटकरी म्हणाले..

'साथ निभाना साथियाँ' मालिकेत देवोलिना भट्टाचार्जीने गोपी बहूची भूमिका साकारली होती.

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'साथ निभाना साथियाँ' saath nibhana saathiya मध्ये गोपी बहू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचर्जीने (Devoleena Bhattacharjee) तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोमध्ये देवोलिना पिवळ्या रंगाच्या बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. देवोलिनाच्या या लूकला काही नेटकऱ्यांची पसंती मिळाली तर काहींनी तिच्या फोटोवर कमेंट करून तिला ट्रोल केले आहे.

देवोलिनाने सोशल मीडियावर बिकिनीवरील फोटो आणि डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले. एका नेटकऱ्याने कमेंट केले, 'गोपी बहू, हे तुला काय झालं' तर दुसऱ्या युझरने लिहिले, 'आता कोकिलाबेन तुझ्यावर रागावणार'. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सगळे बिघडतात, असं म्हणत देवोलिनाला ट्रोल केलं.

2019 मध्ये देवोलिना 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. या सिझनमधील देवोलिनाच्या बिनधास्त आणि बॉल्ड अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेच्या दुसऱ्या सिझनच्या प्रमोशनदरम्यानही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी देवोलिना ही ज्वेलरी डिझाइनरची नोकरी करत होती. तिने 'डान्स इंडिया डान्स २' या रिअॅलिटी शोसाठी ऑडिशनसुद्धा दिलं होतं. मात्र २०१२ मध्ये तिने 'गोपी बहू'ची भूमिका साकारली आणि तिथून तिला तुफान प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT