सलमानला CISF अधिकाऱ्याने अडवलं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

मुंबई विमानतळावरील सलमानचा व्हिडीओ व्हायरल
salman
salman

अभिनेता सलमान खान Salman Khan आणि अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif हे आगामी 'टायगर ३' Tiger 3 या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी रवाना झाले. परदेशी जाताना या दोघांचा मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक CISF अधिकारी कागदपत्र तपासण्यासाठी सलमानला आत प्रवेश करण्यापासून अडवताना दिसत आहे.

सलमान कारमधून बाहेर पडताच तोंडाला मास्क लावून विमानतळाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागतो. प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच त्याला एक अधिकारी अडवतो आणि कागदपत्रांविषयी विचारतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सेलिब्रिटीच्या ग्लॅमरला न भुलता आपलं कर्तव्य बजावणारा अधिकारी, म्हणून त्याची स्तुती केली जात आहे. 'गणवेशाची ताकद', अशी कमेंट एकाने केली. तर 'अधिकाऱ्याने ज्याप्रकारे सेलिब्रिटीला अडवलं, ते आवडलं', असं दुसऱ्याने लिहिलं.

salman
मंदार देवस्थळी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत

'टायगर ३' या आगामी चित्रपटाची शूटिंग पुढील ४५ दिवस परदेशातील विविध पाच ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये ऑस्ट्रिया आणि टर्की यांचाही समावेश आहे. हा संपूर्ण अॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यासाठी परदेशातील शूटिंगचं नियोजन करण्यात आलं आहे. 'टायगर ३' हा 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटांच्या सीरिजमधला तिसरा भाग आहे. पहिल्या भागाचं दिग्दर्शक कबीर खान तर दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com