after Seeing Urfi javed in fully clothed, the lady fan on the wheelchair jumped up and hug her sakal
मनोरंजन

Urfi Javed: बाबो! उर्फीला पूर्ण कपड्यात पाहून व्हीलचेअर वरची बाई टणकन उडली अन् थेट..

उर्फी जावेदचा एक फॅन व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

नीलेश अडसूळ

urfi javed: उर्फी जावेद हे नाव समोर आलं तरी चित्र विचित्र फॅशन आणि तिचे वादग्रस्त मुद्दे समोर येतात. उर्फीने आपल्या फॅशनने जळवा दाखवलाच आहे पण तिच्यावर टीका करणाऱ्या भल्याभाल्यांना तिने जेरीस आणले आहे. आता उर्फी पुन्हा चर्चेत आली आहे, ते तिच्यामुळे नाही तर तिच्या फॅनमुळे..

उर्फी आपल्याला कायमच विचित्र आणि तोकड्या कपड्यांमध्ये दिसत असते. ज्या दिवशी उर्फी पूर्ण कपडे घालते तोही चर्चेचाच दिवस असतो. लोक तिला प्रचंड ट्रोल करतात, आता तर उर्फी सोबत तिची फॅनही ट्रोल होत आहे.

सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उर्फी विमानतळावरून घरी परतताना दिसत आहे. यावेळी तिची एक फॅन समोर येते, जी व्हिलचेअर बसलेली असते. उर्फीला पाहताच ती चकित होते आणि व्हीलचेअर वरून उठून थेट उर्फीला मिठी मारते, तिच्या सोबत सेल्फी काढते. हाच व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

या व्हिडिओवर प्रचंड भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. 'उर्फीला पूर्ण कपड्यांमध्ये पाहून तिची फॅन व्हीलचेअर वरून उठली आणि चालू लागली' असे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. तर 'ही लेडी फॅन चक्क उर्फीला पाहून चालू लागली ही मोठी प्रेरणा आहे' असेही एकाने म्हंटले आहे.

तर काहींनी 'जी बाई चालू शकत नाही ती सेल्फी बरी घेऊ शकते' असेही उपरोधाने म्हंटले आहे. तर अनेकांनी त्या फॅनवर टीका करत तिला ट्रोल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT