Deepa Parab: मनातली इच्छा अंबाबाईनंच पूर्ण करून घेतली.. अंकुशच्या बायकोचा हा किस्सा बघाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tu chal pudha marathi serial fame actress Deepa Parab chaudhari visit to mahalaxmi ambabai temple kollapur

Deepa Parab: मनातली इच्छा अंबाबाईनंच पूर्ण करून घेतली.. अंकुशच्या बायकोचा हा किस्सा बघाच..

Tu Chal Pudh: झी मराठीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे. एक गृहिणी जेव्हा स्वतच्या पायावर उभी राहते तेव्हा तिची जिद्द, तिला होणारा विरोध आणि तिच्या यशाची गोष्ट या मालिकेतून समोर येते.

घराघरतल्या गृहिणी सुद्धा असेच स्वप्न पाहत असल्याने ही मालिका महिला वर्गात विशेष लोकप्रिय आहे. म्हणूनच बघता बघता या मालिकेने १५० भागांचा टप्पा पूर्ण केला. पण या यशाचे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे एक खास कनेक्शन आहे. अश्विनीने एक व्हिडिओ शेयर करत नुकतेच हे गुपित उघड केले आहे.

(tu chal pudha marathi serial fame actress Deepa Parab chaudhari visit to mahalaxmi ambabai temple kolhapur)

अश्विनीनं घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून मोठ्या हिंमतीनं तिचं ब्युटी पार्लर सुरू केलं आहे. अनेक संकटांना तोंड देत अश्विनीने स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे. आता लवकरच अश्विनी 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होणार असून तिचा तो प्रवास सुरू झाला आहे.

त्यामुळे सर्वस्तरतून अश्विनीला म्हणजेच अभिनेत्री दीपा परब - चौधरीला खूप प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने दीपाने तब्बल १४ वर्षांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिच्या साठीही हा क्षण 'तु चाल पुढं' म्हणणाराच होता, पण तिने हे शिवधनुष्य पेललं आणि यशस्वी करून दाखवलं.

मात्र या यशमागे अंबाबाईचे आशीर्वाद असल्याचे दीपा मानते, नुकताच दीपा ने एक व्हिडिओ शेयर केला ज्यामध्ये ती अश्विनी प्रमाणेच घरातली सगळी कामं उरकून शूट ला जाताना दिसते, दरम्यान ती गाडीतून कोल्हापूरला जात आल्याचे ती सांगते.

दीपा म्हणते, 'मालिका सुरू झाली तेव्हा काय होणार माहीत नव्हते. १४ वर्षांनी मी पुन्हा कामाला सुरुवात करत असल्याने महालक्ष्मीच्या दर्शनाने या प्रवासाची सुरुवात केली. नुकताच आम्ही १५० भागांचा टप्पा पूर्ण केला तेव्हा मनात आलं की आपण पुन्हा जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. पण कामामुळे ते शक्य होतं नव्हतं. पण अचानक एका कार्यक्रमासाठी मला कोल्हापूरहूं आमंत्रण आलं आणि चटकन होकार दिला. कारण मनातली इच्छा देवीनं बोलावणं धाडून पूर्ण करून घेतली. ज्याचा मला खूप आनंद आहे.'