Priyanka Chopra's Don 3 entry Esakal
मनोरंजन

Don 3: 'जंगली बिल्ली' परतणार! शाहरुखने सोडल्याबरोबर प्रियंका चोप्रा करणार 'डॉन 3' मध्ये एंट्री?

प्रियंका चोप्रा येतोय 'डॉन 3'मध्ये: बॉलीवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री!

Vaishali Patil

Priyanka Chopra's Don 3 entry: बॉलीवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही सध्या हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन करणारअशी चर्चा होती. यापुर्वी ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार होती पण हा सिनेमा रखडला. मात्र आता पुन्हा प्रियंकाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

ती आता फरहानच्या सुपरहिट फ्रँचायझी 'डॉन'च्या 'डॉन 3'मध्ये पुन्हा कमबॅक करणार असल्याचा दावा मिडिया रिपोर्टनुसार केला जात आहे. फरहान अख्तरने नुकतीच डॉन 3 ची घोषणा केली होती.

मात्र आता डॉनच्या भुमिकेत शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग दिसणार आहे. शाहरुख खान डॉन फ्रँचायझीमधून बाहेर आहे. त्यामुळे आता या चित्रपटात प्रियंका रणवीर सिंगसोबत दिसणार असल्याचं बोलले जात आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्रा अलीकडेच फरहान अख्तरला भेटली. त्यांनी डॉन 3 वर चर्चा केली. त्यानंतर आता प्रियंकाने डॉन 3 च्या लीड रोलसाठी होकार दिला आहे. असं बोललं जात आहे. यापूर्वी डॉन 3 साठी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यांच्या नावाची चर्चा सुरु होती.

प्रियंका 'डॉन 3'मध्ये दिसली तर ती चौथ्यांदा रणवीरसोबत स्क्रिन शेयर करेल. दोघेही पहिल्यांदा 2014 मध्ये 'गुंडे' चित्रपटात दिसले होते. याशिवाय 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो' या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.

फरहानची 'डॉन' फ्रेंचाइजी 2006 मध्ये सुरू झाली. या चित्रपटात शाहरुख, प्रियंका, करीना कपूर आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होते. यानंतर 2011 मध्ये डॉनचा दुसरा भाग आला. आता 12 वर्षांनंतर फरहान या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे, ज्यामध्ये रणवीर पहिल्यांदाच डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT