Dhanush, Aishwaryaa Rajinikanth (Ex-wife of Dhanush)  Google
मनोरंजन

ऐश्वर्या रजनीकांतनं अखेर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं हटवलं धनुषचं नाव

जानेवारी २०२२ मध्ये या दोघांनी एकत्रितपणे निवेदन प्रसिद्ध करीत आपण विभक्त होत असल्याचं जाहिर केलं होतं.

प्रणाली मोरे

दाक्षिणात्य अभिनेता धनुष(Dhanush) आणि त्याची पू्र्वाश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत(AIshwwaryaa Rajinikanth) ने आपल्या १८ वर्षाच्या नात्याचा The End केल्याचं जेव्हा जाहिर केला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. ऐश्वर्या आणि धनुष यांनी आपल्या घटस्फोटाविषयीची माहिती देताना एक निवेदन प्रसिद्द केले होतं. आता या बातमीनंतर अखेर ऐश्वर्या रजनीकांतने सोशल मीडियावरील आपल्या अकाऊंटवरनं धनुषचं नाव हटवल्याचं समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी धनुषनं आपली पूर्वाश्रमीची पत्नी ऐश्वर्याला ९ वर्षानंतर दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी शुभेच्छा देताना एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये धनुषने ऐश्वर्याला मैत्रिण म्हणून संबोधलं होतं. धनुषच्या या पोस्टनंतर लगेचच काही दिवसांत ऐश्वर्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं धनुषचं नाव हटवलं. पण यावरनं लोक मात्र वेगवेगळे अंदाज लावत आहेत. आता ऐश्वर्यानं आपल्या सोशल अकाऊंटचं नाव ऐश्वर्या रजनीकांत असं ठेवलं आहे.

Dhanush, Aishwarya Rajnikant (Ex-wife of Dhanush)

ऐश्वर्यानं दिग्दर्शित केलेल्या ज्या गाण्याचं धनुषनं कौतूक केलं होतं ते हिंदी,तेलुगु,मल्याळम,तामिळ अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित केलं गेलं आहे. धनुषने ऐश्वर्याच्या या गाण्याची लिंक शेअर करीत ट्वीट केलं होतं की,'' माझी मैत्रिण 'ऐश्वर्या आर धनुष'ला तिच्या नव्या म्युझिक व्हिडीओसाठी शुभेच्छा. देव तुझं भलं करो''. तेव्हा ऐश्वर्यानं त्याचे आभार मानत म्हटलं होतं,''धन्यवाद धनुष''. एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच ते दोघे सोशल मीडियावर अशाप्रकारे बोलत होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र आनंद झालेला पहायला मिळत होता.

यावर्षी १७ जानेवारीला ऐश्वर्या आणि धनुषनं आपल्या विभक्त होण्याची बातमी देत चाहत्यांना नाराज केलं होतं. तब्बल १८ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी संगनमतानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला,अन् एकत्रितपणे एक निवेदन जाहिर केलं. त्यांनी त्यात म्हटलं होतं,''आम्ही मित्र,पती-पत्नी,आमच्या मुलांचे आई-वडिल आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून तब्बल १८ वर्ष एकत्र राहिलो. आज आम्ही एका अशा वळणावर उभे आहोत जिथनं पुढे आमचे मार्ग वेगळे आहेत. आम्ही पती-पत्नी म्हणून हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जो निर्णय आम्हाला स्वतःला अधिक समजून घेण्यासाठी सहकार्य करेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२००५ मध्ये पुण्याच्या गणेश विसर्जनात नेमकं काय घडलं? ३३ तास २० मिनिटांची मिरवणूक, दगडफेक अन् जाळपोळ

Gopalkala Recipe: नाश्त्यासाठीही बेस्ट! १० मिनिटांत बनवा श्रीकृष्णाला आवडणारा गोपाळकाला; अशी बनवा झटपट रेसिपी

आजचे राशिभविष्य - 05 सप्टेंबर 2026

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ५ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

SCROLL FOR NEXT