24 काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचा व्हिडीओ शेअर करीत अनुपम खेर म्हणाले.. Anupam Kher | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Kher

24 काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचा व्हिडीओ शेअर करीत अनुपम खेर म्हणाले..

'द काश्मिर फाईल्स'(The kashmir Files) सिनेमा जसा त्यातील सत्य घटनेमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतोय तसंच दुसरीकडे सिनेमातील कथानकाला असत्य ठरवून ताशेरे ओढणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. नुकतेच बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा पाहिल्यावर सिनेमाला 'प्रोपोगेंडा' म्हटलं. इतकंच नाही तर सिनेमागृहात मुसलमानविरोधी देण्यात येणाऱ्या घोषणांचा व्हिडीओ शेअर करीत 'द काश्मिर फाईल्स' हिंदू-मुस्लिम वाद सुरू करेल असा देखील आरोप केला. प्रकाश राज यांची सिनेमासाठी आलेली ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया आहे. पण इतरही अनेकांनी सिनेमाविरोधात अशीच 'री' ओढली आहे. अर्थात याचा सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर काहीच परिणाम झालेला नाही. उलट सिनेमा आता २०० करोड कमावेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जसं अनेकांनी सिनेमातील कथानकाचं समर्थन केलं,प्रशंसा केली तसं अनेकांनी सिनेमाला विरोध केला. सिनेमाला 'प्रोपोगेंडा' म्हणणाऱ्यांना आता सिनेमातील ज्येष्ठ कलाकार अनुपम खेर(Anupam Kher) यांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी १९९० सालच्या काश्मिरमधील त्या हत्याकांडाचा व्हिडीओ शेअर करीत म्हटलंय,''हा सिनेमा ज्यांना प्रोपोगेंडा वाटतो त्यांनी एकदा हा व्हिडीओ अवश्य पहावा.

हेही वाचा: 'मैं हूँ कश्मीरी पंडित!'; काश्मिरस्थित रॅपरचं गाणं तुफान व्हायरल

दहशतवाद्यांनी २४ निरपराध काश्मिरी हिंदूंची बेछूटपणे हत्या केली. यात काय खोटं दिसत आहे. या जखमा भरतील कशा हे पहायचं तर तुम्ही काहीही बोलून त्या जखमांना आणखी टोचणी लावताय. त्या हत्याकांडावर दुःख व्यक्त करायचं सोडून नको त्या गोष्टी करत आहात''. असं म्हणत अनुपम खेर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत.

Web Title: Anupam Kher Tweet Viral Genocide Of Innocent Kashmiri Pandit Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top