Akshay Kumar Unveils His First Look From Rohit Shetty Film Singham Again Photo Viral  Esakal
मनोरंजन

Singham Again: सिंघम अगेनमध्ये 'सुर्यवंशी'ची हवेतून एंट्री! खिलाडी कुमारचा लूक आला समोर

Vaishali Patil

Akshay Kumar Singham Again: गेल्या काही दिवसांपासुन रोहीत शेट्टीच्या सिंघम अगेन सिनेमाची चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी रोहितने या चित्रपटाची घोषणा केली. यंदाचा सिंघम हा बराच वेगळा असणार आहे कारण यात कलाकारांची फौजच आहेत. अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार सारख्या हिरोंबरोबरच दीपिका आणि करिना सारख्या अभिनेत्रींही अ‍ॅक्शनचा तडका लावणार आहे.

आता रोहित शेट्टी सिंघम अगेनमधील कलाकारांची चित्रपटाच्या प्रेक्षकांची ओळख करु देत आहे. काही दिवसापुर्वी रोहीत शेट्टी सिंघम अगेन मधील दिपिका पादूकोण आणि रणवीर सिंहचा लूक समोर आला होता.

दिपीका शक्तीच्या भुमिकेत तर रणवीर सिंबाच्या भुमिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता सिंघम अगेनमधील आणखी एका पोलिसाचा लूक समोर आला आहे. हा पोलिस म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार.

आज या चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये लूकमध्ये अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून उडी मारताना दिसत आहे. त्याच्या दोन्ही हातात पिस्तूल आहे. अक्षय पुर्ण अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसत आहे.

पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आला रे आला सूर्यवंशी आला... एटीएस प्रमुख सूर्यवंशीच्या आगमनाची ही वेळ आहे, तुम्ही तयार आहात का? "

तर खरा बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगणने हा फोटो शेयर करत लिहिले की, "मला मनाई होती तरीही माझा मित्र सूर्यवंशी हेलिकॉप्टरने आला आहे..."

अक्षयचा हा धमाकेदार लूक पाहिल्यानंतर चाहते उत्सुक झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून सामाजिक विषयावर चित्रपट तयार करणारा अक्षय आता पुन्हा अ‍ॅक्शन अवतारात दिसल्यामुळे त्याचे चाहते खुपच खुश झाले आहेत.

रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग यांच्याशिवाय दिसणार आहे. यासोबतच अभिनेत्री करीना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोणही या चित्रपटात सरप्राईज पॅकेजच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT