Leo Success Meet: थलपतीचा 'लिओ' वेगानं धावला! विजयच्या लिओ 'सक्सेस मीट'ला पोहचले तब्बल 7 हजाराहून जास्त फॅन

 Leo Success Meet
Leo Success MeetEsakal

Leo Success Party: तमिळ सुपरस्टार थलपथी विजय हा साउथचा सुपरस्टार आहे. त्याचे चाहते हे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या विजय त्याच्या 'लिओ' चित्रपटामुळे चर्चेत आहे. विजयचा लिओ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. विजयच्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे.

 Leo Success Meet
Ranbir at Arijit concert: अरिजित समोर 'अ‍ॅनिमल' झुकला! रणबीर कपूरच्या व्हिडिओनं जिंकलं चाहत्यांचं मन

ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या लिओने 64.8 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग करत आता 300 कोटींच्या क्लबमध्येही प्रवेश केला आहे. दरम्यान, चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी लिओ चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती.

या पार्टीत विजय आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. आता विजयने या पार्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहे. जे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 Leo Success Meet
Aparna Kanekar: साथ निभाना साथिया फेम 'जानकी बा' कालवश! वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1 नोव्हेंबर रोजी नेहरू इनडोअर स्टेडियमवर या चित्रपटाचे यश साजरा करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यत आले होत. यामध्ये थलपती विजयच्या सुमारे 7000 चाहत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी थलपतीच्या क्रेझी चाहत्यांची गर्दी पहायला मिळाली.

हे फोटो शेयर करत विजयने 'हॅशटॅग लिओ सक्सेस मीट' असे कॅप्शन दिले. यावेळी विजने साधा कॉटन ब्राऊन शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. या फोटोंमध्ये चाहत्यांची गर्दी पहायला मिळाली. विजयसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णा, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता गौतम वासुदेव मेनन दिसले.

 Leo Success Meet
एल्विशला अटक का नाही केली? कोटा पोलिसांनी दिले स्पष्टिकरण!

या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले होते तर पटकथा रत्ना कुमार, धीरज वैद्य आणि लोकेश कनगराज यांनी सहलेखन केली होती. लिओला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे.

चित्रपटात खूप अॅक्शन पाहायला मिळाली. लिओने बॉक्स ऑफिसवर जवळपास 540 कोटींची कमाई केली. लवकरच हा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर OTT प्लॅटफॉर्म Netflix वर देखील होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com