bellbottom teaser 
मनोरंजन

BellBottom Box Office day 2: जाणून घ्या, अक्षयच्या चित्रपटाने किती कमाई केली?

सिनेमागृहांमध्ये मर्यादित क्षमतेची अट असल्याने कमाईवर मोठा परिणाम

स्वाती वेमूल

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अभिनेता अक्षय कुमारचा Akshay Kumar 'बेलबॉटम' BellBottom हा चित्रपट तीन कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या दिवशीची कमाईसुद्धा तीन कोटी रुपयांच्या आतच झाल्याचं समजतंय. पहिल्या दोन दिवसांत कमाईचा आकडा हा पाच कोटींपर्यंत गेला आहे. लॉकडाउनच्या अटींमुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह बंद आहेत आणि इतर राज्यांमध्ये मर्यादित क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका चित्रपटाच्या कमाईला बसला आहे. करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'बेलबॉटम' हा पहिला मोठा चित्रपट आहे.

'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी 'बेलबॉटम'ने २.३ ते २.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाअखेर कमाईचा आकडा हा ५.०५ ते ५.२५ कोटी रुपये इतका होईल. वीकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केल्यास हा आकडा १३ कोटींपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. देशभरातील एक हजारहून कमी चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. त्यातही मर्यादित क्षमतेची अट असल्याने कमाईवर मोठा परिणाम झाला.

'रुही' आणि 'मुंबई सागा' या दोन्ही चित्रपटांच्या कमाईपेक्षा कमी कमाई बेलबॉटमने प्रदर्शनाच्या दिवशी केली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर चित्रपटगृहांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी दिल्यानंतर रुही आणि मुंबई सागा प्रदर्शित झाले होते. रुहीने पहिल्याच दिवशी तीन कोटी रुपयांची कमाई केली होती तर मुंबई सागाने २.८२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT