Alia Bhatt, Emraan Hashmi Instagram
मनोरंजन

Alia Bhatt चे प्रायव्हेट फोटो इमरान हाश्मीच्या घरातून लीक?; काय आहे कनेक्शन..जाणून घ्या

आलिया भट्टचे राहा सोबतचे घरातील काही खास क्षण तिच्या परवानगिशिवाय क्लीक करत एका मीडिया हाऊसनं ते एक्सक्लुसिव्ह म्हणत पब्लिश केले होते.

प्रणाली मोरे

Alia Bhatt Private Photo Leak: आलिया भट्ट आपला पर्सनल व्हिडीओ लीक झाल्यामुळे सध्या भलतीच रागात आहे. तिचा पती रणबीर कपूर देखील कुटुंबासोबत मिळून तिचा व्हिडीओ लीक केलेल्या न्यूज पोर्टलवर अॅक्शन घेण्याच्या विचारात आहे.

यादरम्यान अनेकांना आता हे जाणून घ्यायचं आहे की अखेर फोटोग्राफर्स आलिया घरच्या घरापर्यंत पोहोचले कसे? लोकांना वाटत होतं की फोटो शेजारच्या एखाद्या इमारतीमधून क्लीक केले असावेत.

आता काही रिपोर्ट्सनुसार कळत आहे की हे फोटो इमरान हाश्मीच्या घरातून क्लीक केले गेले आहेत.(Alia Bhatt Private Photo leak from emraan hashmi's Home..read connection)

आलिया भट्ट आपल्या घरात बेबी राहासोबत खेळण्यात बिझी होती. तेव्हा ईटाईम्सनं त्यांचे काही फोटो एक्सक्लुसिव्ह वॉटरमार्क सोबत शेअर केले. आलियाला जेव्हा हे कळलं तेव्हा ती भडकली आणि इन्स्टाग्रामवर तिनं न्यूज वेबसाईटची जोरदार प्रतारणा केली.

आता चर्चा आहे की हे फोटो इमरान हाश्मीच्या घरातून लीक झाले आहेत. अर्थात या पूर्ण प्रकरणात स्वतः इमरानचा काही दोष नाही. त्याचं झालं असं की इमरानच्या 'सेल्फी' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं त्याच्या घरी मीडियाचे काही लोक गेले होते.

आलिया भट्ट आणि इमरान हाश्मीचं घर बान्द्यात आमने सामने आहे. इमरानचे पाहुणे म्हणून गेलेल्या फोटोग्राफर्सनी संधीचा फायदा घेत अशी हरकत केली की आता प्रत्येकजण लोकांच्या प्रायव्हेट लाइफमध्ये मीडिया दखल देते याला नावं ठेवताना दिसत आहे.

रणबीर त्यावेळी घरी उपस्थित नव्हता. घरी परतल्यावर त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्यानं सुरक्षा वाढवली आहे. आता तो विचार करत आहे की त्याला फोटोग्राफर्सवर अॅक्शन घ्यायची आहे की नाही.

रणबीर आणि आलियानं फोटोग्राफर्सना याआधीच राहाचा फोटो दाखवला आहे. त्यांनी मीडियाला विनंती देखील केली होती की त्यांनी राहाचा फोटो कुठेही ते सांगेपर्यंत लीक करू नये.

तर सोशल मीडियावर आता आलियाची पोस्ट रीपोस्ट करत सेलिब्रिटी देखील मीडियाच्या या चुकीच्या हरकतीवर बोटं ठेवताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT