Hera Pheri 3 च्या सेटवरुन लीक झाला पहिला फोटो.. यावेळी 'या' अंदाजात दिसणार राजू,श्याम आणि बाबू भैय्या Hera Pheri 3 first photo leak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hera Pheri 3

Hera Pheri 3 च्या सेटवरुन लीक झाला पहिला फोटो.. यावेळी 'या' अंदाजात दिसणार राजू,श्याम आणि बाबू भैय्या

Hera Pheri 3: राजू,श्याम आणि बाबू भैय्या या तिघांची जोडी परत आली आहे. कारण हेरा फेरी ३ चं शूटिंग सुरू होत आहे. फिरोज नाडियादवालानं देखील या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये अक्षय कुमारच दिसणार यावर पुष्टी दिली आहे.

आता सिनेमाच्या सेटवरनं एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार,सुनील शेट्टी आणि परेश रावल एका फ्रेममध्ये दिसत आहेत. (Hera Pheri 3 first photo leak akshay kumar suniel shetty paresh rawal)

Hera Pheri 3

Hera Pheri 3

एका फॅन पेजनं ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे,ज्यात अक्षय कुमार एक फ्लोरल शर्ट आणि लाल पॅंटमध्ये,परेश रावल धोती आणि पांढरा कुर्ता तर सुनिल शेट्टी हिरव्या रंगाचा शर्ट आणि काळ्या पॅंटमध्ये दिसत आहे.

अभिनेत्यांनी सर्व टीमसोबत हा फोटो क्लीक केला आहे. व्हायरल फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की,''आज भारतातून सगळ्यात बहुप्रतिक्षित फोटो सादर करण्यात आला आहे..राजू,श्याम आणि बाबू भैय्याची तिकडी परत येतेय.# हेराफेरी3.''

फोटो पाहून चाहते खूपच एक्सायटेड झाले आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की,'खूपच सुंदर व्यक्तीरेखा..मी परेश रावलना खूप मिस केलं...पण आता सगळंच नवीन असायला हवं आणि जुन्या हेराफेरी सारखं सगळं नको. नाहीतर आम्हाला पहायला इंट्रेस्ट वाटणार नाही. आता त्यांना एका नव्या अवतारात पहायला आम्हाला आवडेल'.

आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे,' हेराफेरी ३ मध्ये राजूचा गेटअप@ अक्षय कुमारला पाहून खूप आनंद झाला'.

आणखी एकानं लिहिलं आहे की,'मी हे पाहून आनंदानं वेडा झालोय..'

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'वाह वाह वाह..हेराफेरी ३ बॉक्सऑफिसवरचा रेकॉर्ड तोडणार आहे'.

आता एका जवळच्या सूत्रांकडून कळलं आहे की, ''आगामी हेराफेरी सिनेमाला 'हेराफेरी ३' संबोधलं जाणार नाही. याऐवजी,निर्मात्यांनी सिनेमाचं नाव 'हेराफेरी ४' असं ठेवण्याचं निश्चित केलं आहे. निर्मात्यांना वाटतं की हेच नाव या सिनेमाच्या कथेसाठी योग्य आहे..आणि प्रेक्षकही यामागचं कारण समजून घेतील''.

हेराफेरी ४ सिनेमा अद्याप फ्लोअरवर आलेला नाही. नुकतंच फक्त अक्षय कुमार,सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी एका प्रोमोचं शूटिंग केलं..ज्यात घोषणा केली गेली की ब्लॉकबस्टर कॉमेडी फ्रॅंचाइजीच्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल.