Amitabh Bachchan Google
मनोरंजन

अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर;असं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

सोशल मीडियावर एका अभिनेत्रीसोबतचा फोटो पोस्ट केल्यामुळे बिग बी चर्चेत...

प्रणाली मोरे

अभिनयातील महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावासायिक घडामोडींचे अपडेट्स नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या पोस्ट्सचे नेटकऱ्यांकडून कौतूकच झालेलं पहायला मिळतं पण त्यांच्या काही पोस्टवर ट्रोलर्सकडून टिकाही होते. २६ जानेवारीला त्यांनी त्यांची दाढी भारतीय झेंड्याच्या तीन रंगात रंगवून तसा फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी त्यांच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विरोध दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता पुन्हा त्यांच्या अशाच एका फोटो पोस्टवर नेटकऱ्यांनी नको त्या प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. तो त्यांच्या एका जुन्या सिनेमातला आहे. त्यामध्ये त्यांच्या हातात एका अभिनेत्रीचा हात आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलंय,''ओळखा पाहू,माझ्या हातात कोणाचा हात आहे?''...यावर सर्वसामान्य नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. फराह खान म्हणालीय,''श्रीदेवी''. तर एक नेटकरी म्हणाला आहे,''झीनत अमान'', तर एकानं मुद्दामहून म्हटल्यासारखं म्हटलंय,''नक्कीच रेखाचा हात असणार'',तर एकानं म्हटलंय,''तुमच्या 'एक्स' चा हात आहे का?'' आता अनेकदा नेटकरी प्रतिक्रिया देण्याच्या नादात आपण कुणाशी बोलतोय याचं भान हरपूर बोलतात अन् त्याचा परिणाम अशा प्रतिक्रियांमध्ये परावर्तित होतो.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आधीच्या फोटाला पूर्ण पोस्ट करत त्यांनी उत्तरात सांगितलं,''हा हात श्रीदेवी यांचा होता''. तो फोटो पाहून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या स्मरणार्थ चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर ज्यांनी कोणी आधीच्या फोटोवर श्रीदेवी हे अचूक उत्तर नोंदवलं होतं त्याची नोंदही अमिताभ यांनी आपल्या फोटो पोस्टच्या कॅप्शनच्या माध्यमातून केली आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही अशा प्रकारे सोशल मीडियावर सक्रिय राहणं खरच कौतुकास्पद. नव्या तंत्रज्ञानाला स्विकारतानाच बिग बींनी ट्रोलर्सच्या ट्रोलिंगलाही दुर्लक्षित करणं चांगलंच शिकलं आहे बरं का. ते वादात पडण्यापासून कायम लांब राहणं पसंत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT