Amruta Fadnavis New Song
Amruta Fadnavis New Song 
मनोरंजन

अमृता ताईंचं 'शिवतांडव' Viral; नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव

सकाळ डिजिटल टीम

Amruta Fadnavis: आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीपूर्ण गायकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमृता फडणवीस यांचं नवं गाणं आता थो़ड्यापूर्वी (Entertainment News) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या गाण्याला मिळाला आहे. आतापर्यत चार लाख व्ह्युज मिळाले आहेत. अवघ्या काही तासांत एवढ्या मोठ्या प्रमाणात व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले आहे. काल त्यांच्या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यालाही चाहते आणि नेटकऱ्यांचा प्रतिसाद (Social media News) मिळाला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने चर्चेत असतात. त्या आपल्या स्वतंत्र मतांसाठी जशा प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे त्या आपल्या पार्श्वगायनासाठीही प्रसिद्ध आहेत. (Amruta Fadnavis New Song Shiv Tandav)

अमृता फडणवीस या नवनवी गाणी गाऊन त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांच्या या गाण्यांवर काहीवेळा टीका आणि ट्रोलिंगही होताना दिसून येतं. मात्र, तरीही अमृता फडणवीस या साऱ्या प्रकाराला दुर्लक्षित करुन नवनवी गाणी घेऊन येताना दिसतात. 'जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले' असं कॅप्शन त्यांनी पोस्टरला दिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, भक्ती ही दुर्मिळ आणि एक आकर्षक अशी आध्यात्मिक यात्रा आहे! 24 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्या आयुष्यातील सर्वात दैवी संगीतमय अनुभव रिलीज होत आहे, असं त्यांनी म्हटलंय.विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन दिनादिवशी घोषणा केलेलं हे गाणं भगवान शिवशंकराचं असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शंकराच्या अवतारात स्वत:चाच फोटो टाकला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, मी तुझी निवड आता आणि कायमस्वरूपी केली आहे. तू माझ्या हृदयात आहेस, माझ्या मनात, माझ्या आत्म्यात, विश्वासात आणि श्वासातही आहेस. हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो, त्या दिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय स्तुती अर्पण करतेय. पुढे त्यांनी #valentine #lordshiva असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. तसेच लवकरच येत असल्याची घोषणाही केली आहे.

शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अमृता ताईंचा महाशिवरात्रीपर्यंत नवा मुझिक अल्बम घेऊन येणार असल्याचं त्यांनीच सांगितलं होतं. 'शिवतांडव स्त्रोत्रम्' नावाने त्या गाणं येणार असल्याची चर्चा आहे. याआधी अमृता फडणवीसांनी अनेक गाण्याचे अल्बम काढले आहेत. फडणवीस यांचं गणपतीवर गाणं आलं होतं. यानंतर 'तिला जगू द्या', हे तरुणींवरील अत्याचाराला वाचा फोडणारं गाणंही हीट झालं. तर, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी राज्यातील नद्यांवरही गाणं गायलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT