Anant Ambani wedding latest news esakal
मनोरंजन

Anant Radhika Wedding : 'अंबानींच्या घरचं लग्न'! पाहुणे मंडळीत झुकरबर्ग-बिल गेट्सचं नाव, अनंत-राधिकाच्या 'ग्रँड वेडिंग'ची चर्चा

जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर (Anant Radhika wedding ) या लग्नसोहळ्याला हजर राहणार आहेत.

युगंधर ताजणे

Bill Gates, Zuckerberg to attend Anant Ambani wedding : रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या लाडक्या लेकाचा अनंत अंबानी आणि राधिकाचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी १ ते ३ मार्च दरम्यान त्यांच्यी प्री वेडिंगची जोरदार चर्चा आहे. त्याला जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जगभरातील कोणत्या सेलिब्रेटींचा प्रमुख पाहुण्यांच्या यादीत समावेश?

अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमाला जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येणार असल्याचे बोलले जात आहे. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार..

मेटाचे सीइओ मार्क झुकरबर्ग, टेड पिकचे सीईओ मॉर्गन स्टॅनली, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिझ्नेचे सीइओ बॉब आयगर, ब्लॅक रॉकचे सीइओ लॅरी फिंक, अॅडनॉकचे सीइओ सुलतान अहमद अल जबार, बँक ऑफ अमेरिकेचे चेअरमन ब्रायन थॉमस मोनियान, ब्लॅकस्टोनचे चेअरमन स्टिफन श्वार्झमन, कतार प्रीमिअर मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी, अडोबचे सीईओ शंतनु नारायण

लुपा सिस्टेमचे सीइओ जेम्स मरडॉक, हिलहाऊसचे कॅपिटल फाउंडर झांग ली, बीपी चिफ एक्सक्युटिव्ह मरी ऑनचिनलोस याशिवाय बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी यावेळी हजेरी लावणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.

खरं तर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर रिलायन्स फाउंडेशनच्यावतीनं एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी दिसत होत्या. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या होत्या.

उद्योग विश्वातील मोठं नाव म्हणून मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स उद्योग समुहाकडे पाहिले जाते. त्यांच्या मुलाचा अनंतचा विवाहसोहळा म्हटल्यावर त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता तर त्या सोहळ्यातील प्री वेडिंग लिस्ट आणि वेडिंग लिस्टही समोर आली आहे. जगातील जे मोठे उद्योग आहेत त्यांना अंबानी परिवाराच्यावतीनं निमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT