Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

Kangana Ranaut: अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी कंगना रनौतचं कौतुक केलं आहे.
Kangana Ranaut,Sandeep Reddy Vanga
Kangana Ranaut,Sandeep Reddy Vanga

Kangana Ranaut: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या अॅनिमल (Animal) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली. तर कहींनी या चित्रपटाचा ट्रोल केलं. या चित्रपटामुळे अनेक वाद निर्माण झाले. चित्रपटातील डायलॉग आणि सीन्सवर देखील अनेकांनी आक्षेप घेतला. आता एका मुलाखतीत अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी कंगना रनौतचं कौतुक केलं आहे. पण कंगनानं मात्र संदीप रेड्डींना तिला कोणतीही भूमिका ऑफन न करण्याची विनंती केली आहे.

संदीप रेड्डींनी केलं कंगनाचं कौतुक

कंगनानं संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कंगनानं ट्विटरवर (X) एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये संदीप हे कंगनाचं कौतुक करताना दिसत आहेत. ते म्हणतात, "मला वाटत असेल की, ती भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारु शकते तर मी जाऊन तिला कथा सांगेन. क्वीन आणि इतर अनेक चित्रपटांमधील तिचा अभिनय मला मनापासून आवडला" असं संदीप रेड्डी वांगा म्हणाले. पण आता कंगनानं संदीप रेड्डी वांगा यांच्याबद्दल नुकतच ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये कंगनानं "कृपया मला तुमच्या चित्रपटात कोणतीही भूमिका देऊ नका" असं सांगितलं आहे.

काय म्हणाली कंगना?

कंगनानं संदीप रेड्डी वांगाचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "समीक्षा आणि टीका एकच नसतात, प्रत्येक कलाकृतीची समीक्षा आणि चर्चा व्हायला हवी, ही एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या समीक्षेवर हसत हसत संदीपजींनी ज्या प्रकारे माझ्याबद्दल आदर दाखवला, त्यावरून असे म्हणता येईल की ते केवळ मर्दानी चित्रपटच बनवत नाहीत, त्यांची वृत्तीही मर्दानी आहे."

कंगना म्हणते, "मला कधीही कोणतीही भूमिका देऊ नका!"

पुढे तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "धन्यवाद सर. पण कृपया मला कधीही कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा तुमचे अल्फा पुरुष नायक स्त्रीवादी होतील आणि मग तुमचे चित्रपटही फ्लॉप होतील, तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवा, चित्रपटसृष्टीला तुमची गरज आहे." कंगनाच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कंगना ही लवकरच इमर्जन्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com