Animal Movie Bobby Deol bollywood Actor mother reaction  esakal
मनोरंजन

Animal पाहिल्यावर काय होती 'लॉर्ड बॉबी'च्या आईची प्रकाश कौर यांची पहिली प्रतिक्रिया?

प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल हा आता त्याच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Animal Movie Bobby Deol bollywood Actor mother reaction

प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल हा आता त्याच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. भलेही त्याला त्या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका निभावली आहे मात्र त्यानं त्यात जी भूमिका केली आहे त्याचं वारेमाप कौतुक होत आहे. चाहत्यांनी बॉबीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या सगळ्यात बॉबीच्या आईनं प्रकाश कौर यांनी ज्यावेळी अॅनिमल पाहिला तेव्हा त्या कमालीच्या भावूक झाल्याचे दिसून आले आहे.बॉबीनं त्याविषयीचा खास अनुभव शेयर केला आहे. केवळ आईच नाहीतर कुटूंबियांनी जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना काय वाटले याविषयी देखील त्यानं सांगितलं आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या अॅनिमल चित्रपटानं सध्या देशभरामध्ये वेगळचं वादळ तयार केलं आहे. जिकडे तिकडे या चित्रपटाची चर्चा आहे. त्यात रणबीर कपूरनं तर प्रेक्षकांना आपल्या भूमिकेनं प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. बॉबीच्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. सोशल मीडियावर लॉर्ड बॉबी चे तुफान चाहते आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याची तोंडभरुन स्तुती केली आहे.

बॉबीच्या आतापर्यतच्या करिअरमधील सर्वात लोकप्रिय फिल्म म्हणून अॅनिमलचे नाव घेता येईल. बॉबीच्या आईनं जेव्हा त्याचा हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती याविषयी बॉबीनं सांगितलं आहे. तो म्हणाला, चित्रपटातील माझ्या मृत्यूचा सीन आईला सहन झाला नाही. ती मला म्हणते की, तू असे चित्रपट का करतोस, मला ते पाहणं खूप जड जातं. त्यावेळी मी तिला म्हणालो की, मी आता तुझ्यासमोर उभा आहे. मला काही झाललं नाही.

यापूर्वी धर्मेंद्र यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये मृत्यूचा सीन होता. तो पाहिल्यानंतर बॉबीनं म्हटलं होतं की, आपल्याला ते सहन झाले नाही. त्यानंतर आता त्याच्याच चित्रपटातील तो सीन पाहिल्यानंतर आईच्या प्रतिक्रियेनं बॉबीही भावूक झाला आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये बॉबीनं सविस्तर याविषयी माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात बंदी असूनही लेझर लाईटचा धुमाकूळ

Nainital Adventure Sports: नैनीझीलच्या लाटांवर रंगणार जलक्रीडेचा थरार; स्विमिंग-कयाकिंगसोबत विंड सर्फिंग अन् डायव्हिंग

Pica Disorder Case: पोटात ६ सुया, हेअर पिन अन् काचेचे तुकडे; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत महिलेचा जीव वाचला! काय आहे पायका डिसऑर्डर?

Nagpur illegal steroid sale: नागपुरात परवाना नसताना टेस्टोस्टेरॉन औषधांची विक्री; १६.६५ लाखांचा साठा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

Pune Airport : विमानतळावर ‘ई-बोर्डिंग’ सुविधा; इमिग्रेशनसाठी शिक्का मारण्याची पद्धत आता बंद

SCROLL FOR NEXT