Animal Review: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चांगला की वाईट? सिनेमा पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल सिनेमा कसा आहे? वाचा हा रिव्ह्यू
ranbir kapoor animal movie review spoiler free sandeep reddy vanga rashmika mandanna
ranbir kapoor animal movie review spoiler free sandeep reddy vanga rashmika mandanna SAKAL

Animal Review: 'अ‍ॅनिमल' सिनेमा. कबीर सिंगचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा दुसरा बॉलीवूड सिनेमा. सिनेमाची उत्सुकता शिगेला. रणबीर कपूर - अनिल कपूर - रश्मीका मंदाना - बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट. सिनेमाची लांबी साडेतीन तास. सिनेमा सुरू होतो - इंटरवल होतो - सिनेमा संपतो. आणि शेवटी एकच वाटतं.. एक ना धड भाराभर चिंध्या.

(Animal movie review spoiler free)

ranbir kapoor animal movie review spoiler free sandeep reddy vanga rashmika mandanna
Jhimma 2: महाराष्ट्रात शुटिंग करायचं तर....झिम्माच्या दिग्दर्शकाची झणझणीत पोस्ट व्हायरल

संदीप रेड्डी वांगा यांनी कबीर सिंग भाग 2 बनवलाय का? असं वाटतं एका क्षणी. सिनेमा अगदीच वाईट आहे असं म्हणणार नाही पण सिनेमा गंडलाय हे निश्चित. अ‍ॅनिमलची कथा बघता तो आणखी चांगला होण्याची खूप क्षमता होती. पण हीच कथा पडद्यावर मांडताना दिग्दर्शकाने हिंसा आणि ॲक्शनवर भर दिला असल्याने गोष्ट बाजूलाच राहते.

अ‍ॅनिमलची गोष्ट spoiler फ्री सांगायची झाली तर.. एक बाप (अनिल कपूर) आहे. तो त्याच्या बिझनेसमध्ये व्यस्त असतो. त्याचं घरी इतकं लक्ष नसतं. त्याचं बापाचा एक मुलगा (रणबीर कपूर) आहे. वडिलांनी कितीही दुर्लक्ष केलं, मारझोड केली, मतभेद असले तरीही त्याचं वडिलांवर खूप प्रेम असतं. अशातच त्याच्या वडिलांवर एका अज्ञात गँगकडून गोळीबार होतो. आणि मग मुलगा सुडाने पेटून उठतो. वडिलांसाठी जीव द्यायला आणि जीव घ्यायला तयार असतो. मग त्याच्या वडिलांच्या मागे लागणारे हे गुंड कोण? मुलगा वडिलांचा जीव वाचवण्यासाठी कोणत्या थराला जातो? आणि शेवटी या संघर्षात बाजी कोण मारतं? ही गोष्ट आहे अ‍ॅनिमलची. अजून काही सांगू शकत नाही.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने अ‍ॅनिमल काहीसा बोल्ड बनवला आहे. काही प्रसंग प्रेक्षकांना खटकू शकतात. रक्तपात खूप आहे. थोडासा हॉलिवूड सिनेमांचा प्रभाव काही प्रसंगात दिसतो. फर्स्ट हाफ एकदम वेगवान आहे. दीड तास कधी संपतात, कळत नाही. मध्यंतराआधी ॲक्शन सीन्स सुद्धा बघायला मजा येते. पण मध्यंतरानंतर मात्र सिनेमा भरकटला आहे. नक्की दिग्दर्शक काय मांडू पाहतोय, हेच उमजत नाही. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते.

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे अ‍ॅनिमलची कथा चांगली होती. वडील - मुलाचे नातेसंबंध डोळ्यासमोर ठेऊन आणखी चांगली कथा फुलवण्यात आली असती. पण दिग्दर्शकाला ते जमलं नाही. मध्यंतरानंतर आवश्यक नसलेला ड्रामा इतका जास्त झालाय की पाहून कंटाळा येतो. काही प्रसंगांची गरज अजिबात नव्हती. त्यामुळे फक्त सिनेमाची लांबी वाढलीय. बाकी काही नाही.

संदीप रेड्डी वांगाचं एक कौतुक की, त्याने संगीताचा वापर मस्त केलाय. आवश्यक तिथे खास बॅकग्राऊंड म्युझिक लावून ॲक्शन सिनमध्ये अजून मजा येते. एके ठिकाणी अजय - अतुलच 'डॉल्बीवाल्या' गाणं येतं. आणि प्रेक्षक ते गाणं मारधाड पाहताना एन्जॉय करतात. याशिवाय पंजाबी गाण्यांचाही खुबीने वापर दिग्दर्शकाने केलाय.

अभिनयाबाबत रणबीरने मस्त काम केलंय. आज्ञाधारक मुलगा जो बाहेरच्या जगात कधी कसा वागेल हे सांगता यायचं नाही, अशी वेगळी भूमिका रणबीरने सुरेख साकारली आहे. ॲक्शन सिन्समध्ये पण रणबीर अवघडल्यासारखा वाटतं नाही. त्याने त्याच्या फिटनेसवर सुद्धा विशेष मेहनत घेतलीये. अ‍ॅनिमल सिनेमात रश्मिका मंदानाची निवड चुकीची आहे. इतकी मोठी भूमिका, इतका चांगला रोल वाट्याला येऊनही रश्मीकाने अभिनय नीट केला नाही. एकतर तिला व्यवस्थित हिंदी बोलता येत नसल्याने तिचे निम्मे संवाद कळत नाहीत. बॉबी देओल, तृप्ती डिमरी, अनिल कपूर अशा कलाकारांचा नीट वापर दिग्दर्शकाने करून घेतला नाहीये ही आणखी एक खंत. सगळा फोकस रणबीर - रश्मीकावर ठेवलाय. एक गोष्ट मात्र नमूद करावी वाटते ती म्हणजे, छोट्याश्या भूमिकेत मराठमोळा उपेंद्र लिमये मात्र छाप पाडतो. उपेंद्र आल्यावर सिनेमात वेगळीच गंमत येते.

ranbir kapoor animal movie review spoiler free sandeep reddy vanga rashmika mandanna
Animal Review : रणबीरचा 'अ‍ॅनिमल' पाहिल्यावर काय होती आलियाची पहिली प्रतिक्रिया?

तर सरतेशेवटी एवढंच सांगावं वाटतं.. अ‍ॅनिमल पाहून विशेष काही हाती लागत नाही. जास्त अपेक्षा घेऊन जाऊ नका अन्यथा निराशा येईल. जर साडेतीन तास सिनेमा बघण्याचे तुमच्याकडे पेशन्स असतील आणि ॲक्शन बघायला आवडतं असेल तर अ‍ॅनिमल एकदा नक्कीच बघू शकता.

ता.क. अ‍ॅनिमल संपल्यावर लगेच उठू नका. शेवटी एक सरप्राइज तुम्हाला मिळेल.. धन्यवाद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com