Animal Twitter Review:  Essakal
मनोरंजन

Animal Twitter Review: 'आरारारा खतरनाक'; काय रणबीर अन् काय बॉबी! नेटकऱ्यांना भलताच आवडला 'अ‍ॅनिमल'.. कसा आहे सिनेमा?

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा या वर्षीचा सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट होता. 'अ‍ॅनिमल' आज शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरू झाले आहेत.

आता प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मिडियावर प्रतिक्रिया देणे सूरु केले आहे. पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी चित्रपटगृहांमध्ये दिसत आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या लोकांनीही सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

आता अनेकांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिल्यानंतर रणबीरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तर अनेकांना बॉबी देओलचा अभिनय खतरनाक वाटला आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सर्वांनाच चित्रपट खुपच आवडला आहे.

'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर निश्चितच धुराळा उडवणार आहे. नेटकरी या चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत आणि चित्रपटाने ब्लॉकबस्टर म्हणत आहेत.

एका प्रेक्षकाने लिहिले, "हा उत्कृष्ट सिनेमा पाहणं चुकवू नका." तर दुसऱ्याने चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचा स्क्रीनशॉट शेयर केला आणि लिहिले, "या लढाईच्या सीनने थिएटरमध्ये खळबळ उडवली आहे. इतर लोकांना काय वाटते ते सांगा, "

आणखी एकानं लिहिले, 'चित्रपट तीन तासांपेक्षा जास्त असल्याने मला आश्चर्य वाटले की आपण इतका वेळ बसू शकू का?.. चित्रपट कधी सुरू झाला.. तो कधी संपला हे मला कळालं नाही.."

याशिवाय आणखी एका व्यक्तीने ट्विट केले की, "हा पहिला बॉलीवूड पॅन इंडिया ब्लॉकबस्टर असेल.. कथा, पटकथा, संगीत, रणबीर कपूरचा अभिनय.. हे सर्व या चित्रपटाचे प्लस पॉइंट्स आहेत.. वजा करण्यासारखे काही नाही.."

ट्विटर प्लॅटफॉर्मवरील अ‍ॅनिमलचे रिव्ह्यू केवळ सकारात्मकच आहेत. चित्रपटांमध्ये खूप हिंसाचार आहे असं बोललं जात मात्र चित्रपट केवळ कुटुंबच नाही तर लहान मुलेही एन्जॉय करू शकतात, असं म्हटंल जात आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळचे शोही हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT