Malvika Raj Wedding: 'कभी खुशी कभी गम' फेम मालविका अडकली लग्न बंधनात! कोण आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार?

Malvika Raj Wedding:
Malvika Raj Wedding:Esakal

Malvika Raj Wedding: 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे खुपच खास होते त्यामुळे सर्वच कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटात लहान पूजाची भुमिका साकारणारी मालविका आता मोठी झाली आहे.

Malvika Raj Wedding:
Bhushan Kumar: 'टी सीरिज'चे मालक भुषण कुमार यांना कोर्टाचा दिलासा, काय होतं प्रकरण?

मालविका राजला तिचा राजकुमार मिळाला आहे. मालविका राजने तिचा प्रियकर प्रणव बग्गासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या मालिकाचे फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गोवा येथे दोघांचे लग्न झाले आहे. त्याचबरोबर मालविका राजचा पती कोण आहे आणि काय करतो असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहे.

मालविकाने गुरुवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला. ज्यात तिने लिहिले, "आमची हृदये प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेली आहेत #MalusLoveBug #Married #Forevemin."

Malvika Raj Wedding:
Akshay Kumar: बायकोनं केला अपमान! अक्षय कुमारच्याबाबत असं घडलं तरी काय?

या लग्नाच्या खास दिवशी मालविकाने गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा परिधान केला होता. सोन्याच्या दागिन्यांसह तिने आपला लूक पूर्ण केला. तर प्रणवने एम्ब्रॉयडरी शेरवानीमध्ये केशरी आणि सोनेरी लूक कॅरी केला होता.

मालविका राजचा पती प्रणव बग्गा हा एक बिझनेसमन आहे. यासोबतच तो डिजिटल मार्केटिंग कंपनी, जिम आणि फॅशन कंपनीचा डायरेक्टर देखील आहे.

Malvika Raj Wedding:
Ranbir Kapoor : रणबीरचं 'ऑनस्क्रीन' तरी बापासोबत पटलेलं दिसत नाही! कोणत्या चित्रपटांमध्ये दिसला 'बापलेका' चा संघर्ष?

मालविकाने ऑगस्ट 2023 च्या सुरुवातीला प्रणवसोबतच्या लग्न करणार असल्याचे सांगितले होते. प्रवणने तिला तुर्कीमध्ये प्रपोज केले होते.

'कभी खुशी कभी गम'सोबतच, मालविका अॅक्शन फिल्म 'स्क्वाड' मध्ये देखील दिसली होती. ती सोशल मिडियावर देखील सक्रिय असते. आता नेटकरी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com