animal trailer seen in burj khalifa dubai ranbir kapoor bobby deol bhushan kumar SAKAL
मनोरंजन

Animal: शाहरुखनंतर रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'चा टिझर झळकला बुर्ज खलिफावर, व्हिडीओ बघा

अ‍ॅनिमलचा खास ट्रेलर बुर्ज खलिफावर पाहताना रणबीर कपूरचा खास व्हिडीओ पोस्ट केलाय

Devendra Jadhav

Animal Burj Khalifa: रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अ‍ॅनिमल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूर - रश्मिका मंदाना - बॉबी देओल अशा कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

अ‍ॅनिमल सिनेमाला एक खास सन्मान मिळालाय. तो म्हणजे अ‍ॅनिमलचा सिनेमा थेट बुर्ज खलिफावर झळकला.

अ‍ॅनिमलचा खास ट्रेलर बुर्ज खलिफावर

अ‍ॅनिमलच्या निर्मात्यांनी सिनेमाचा टीझर चित्रपटाच्या रिलीजपूर्वी संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुर्ज खलिफावरील अ‍ॅनिमलचा खास ट्रेलर दाखवला जात आहे. यावेळी रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि भूषण कुमारही दिसत आहेत.

बुर्ज खलिफावर ट्रेलर झळकाल्याने रणबीर कपूरच्या आनंदाला उधाण

रणबीर, बॉबी आणि निर्माते भूषण कुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हे तिघे गगनचुंबी इमारत बुर्ज खलिफावर झळकलेला चित्रपटाचा ट्रेलर पाहत आहेत. रणबीर हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे.

यावेळी रणबीरच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्याने चाहत्यांसोबत सेल्फीही काढले. बुर्ज खलिफावर चित्रपटाचा 60 सेकंदाचा खास ट्रेलर व्हिडिओ दाखवण्यात आला.

या दिवशी अ‍ॅनिमल सिनेमा येणार भेटीला

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला अ‍ॅनिमल सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे. सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होतोय.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी केलं लग्न; सत्य समोर येताच पायाखालची जमीनच सरकली, असं काय घडलं?

"ते नातं म्हणजे म्हणजे भयानक स्वप्न !" राज कपूर यांच्या प्रेमाचा नर्गिस यांनी केलेला अपमान

Latest Marathi News Live Update : साक्री तालुक्यात कपाशी लागवडीला वेग; शेतशिवारात लगबग वाढली

SCROLL FOR NEXT