Animal Satranga Song: 'करवा चौथ'स्पेशल रणबीर- रश्मिकाच्या अ‍ॅनिमलमधील 'सतरंगी' गाणं रिलिज!

अ‍ॅनिमल' मधील 'सतरंगा' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यातही रणबीर आणि रश्मिकाची केमेस्ट्री प्रेक्षकांना दिसत आहे.
Animal Satranga Song
Animal Satranga Song Esakal

Animal Satranga Song: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला होता आणि त्यानंतर चाहते या चित्रपटाबाबत अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत.

नुकतच अ‍ॅनिमल मधील पहिलं गाणं रिलिज झालं होत ज्यात रश्मिका आणि रणबीरचा रोमँटिक अंदाज सर्वांनाच आवडला. या गाण्यात दोघांचे लग्न दाखवण्यात आले होते आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे पुढचे गाणे रिलिज केले आहे.

Animal Satranga Song
Bigg Boss 17: "अगं अंकिता तुझा नवरा...", सलमाननं उघड केलं विकीचं पितळ! व्हिडिओ व्हायरल

'अ‍ॅनिमल' मधील 'सतरंगा' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यातही रणबीर आणि रश्मिकाची केमेस्ट्री प्रेक्षकांना दिसत आहे. आत रणबीर आणि रश्मिका एकमेकांवर रोमान्स करताना दिसताय मात्र या गाण्यात दोघांच्या नात्यात खटके उडल्याचे दिसत आहे.

'सतरंगा' या गाण्याला अरिजित सिंगने आपला आवाज दिला आहे, तर गाण्याचे बोल सिद्धार्थ-गरिमाने लिहिले आहेत. श्रेयस पूर्णिक याने संगीत दिग्दर्शन केले आहे. 'सतरंगा' गाण्यात रश्मिका आणि रणबीर करवा चौथ साजरा करताना दिसत आहेत. त्यामुळे यावर्षीच्या करवा चौथला सतरंगा गाण्याचा बोलबाला असणार आहे. यात काही शंकाच नाही.

Animal Satranga Song
Lalu Prashad Yadav Biopic: आता लालू प्रसाद यादव यांच्यावर येणार बायोपिक! प्रकाश झा करणार निर्मिती

'अ‍ॅनिमल'चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदा स्क्रिन शेयर करणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com