ankita lokhande 
मनोरंजन

"त्याने मला हॉटेलच्या रुममध्ये बोलावलं आणि.."; अंकिताने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

स्वाती वेमूल

आजवर अनेक अभिनेत्री चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी व्यक्त झाल्या. आता टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत मजल गाठणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी व्यक्त झाली. कलाविश्वात आपली ओळख निर्माण करत असताना आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री झाल्यानंतरही तिला या प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबद्दल व्यक्त झाली. एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असता तिला निर्मात्यांनी तडजोड करावी लागेल असं म्हटलं. 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने याविषयी सांगितलं, "मी त्यावेळी १९-२० वर्षांची होती. हॉटेलमध्ये त्या व्यक्तीने मला भेटायला बोलावलं होतं आणि हॉटेलच्या रुममध्ये मी त्याच्यासोबत एकटीच होती. त्यांनी मला काम मिळवण्यासाठी तडजोड करावी लागेल असं सांगितलं. तेव्हा मी त्यांना थेट विचारलं की, कशाप्रकारची तडजोड? मला पार्ट्यांना जावं लागेल की डीनर डेटला? त्यावर त्यांनी माझ्याकडे चुकीच्या पद्धतीची मागणी केली. ते ऐकताच मी त्यांना सुनावलं की, निर्मात्यांना अभिनयासाठी प्रतिभावान मुलगी नको तर त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हवी. त्यानंतर मी तेथून निघाली. नंतर त्या निर्मात्याने माझी माफी मागितली पण मी त्यांच्यासोबत काम करण्यात नकार दिला."

अंकिताने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिला पुन्हा एकदा कास्टिंग काऊचच्या अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. "मला त्या व्यक्तीचं नाव सांगायचं नाही. तो खूप मोठा अभिनेता होता. पहिल्या भेटीतच त्याने ज्याप्रकारे माझा हात धरला, त्यावरूनच मला त्याचे हेतू समजले. मी लगेचच माझा हात खेचून घेतला आणि त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला", असं ती पुढे म्हणाली. 

अंकिताने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलं होतं. या मालिकेनंतर अंकिताला बऱ्याच चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले होते. मात्र सुशांतसोबत लग्न करण्यासाठी तिने त्या भूमिकांना नकार दिल्याचं तिने सांगितलं. २०१९ मध्ये 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'बागी ३' या चित्रपटातही ती झळकली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT