इमरानला 'तो' शब्द उच्चारणं पडलं महागात; ऐश्वर्याची मागावी लागली माफी

emraan and aishwarya
emraan and aishwarya

बॉलिवूडमध्ये विविध कलाकारांमधील वाद काही नवीन नाहीत. काही कलाकार हे वाद विसरुन पुन्हा एकत्र आले. तर वादामुळे काहींच्या नात्यात कायमचाच दुरावा निर्माण झाला. जवळपास पाच वर्षांपूर्वी अभिनेता इमरान हाश्मीने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख 'प्लास्टिक' असा केला होता. आज इमरानच्या वाढदिवसानिमित्त हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावेळी मात्र ऐश्वर्याने यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. पण चार वर्षांनंतर ती यावर व्यक्त झाली होती. इतकंच नव्हे तर तिने इमरानसोबत चित्रपटात काम करण्यासही नकार दिला होता. हा वाद पुढे वाढू नये म्हणून अखेर इमरानने ऐश्वर्याची माफी मागितली होती. 

'बादशाहो' या चित्रपटात इमरानसोबत ऐश्वर्याला घ्यायचा दिग्दर्शकांचा विचार होता. यासाठी तिच्याकडे विचारणा केली असता तिने दिग्दर्शकांसमोर अटच ठेवली. एकतर चित्रपटात इमरान काम करेल किंवा मी, अशी अट तिने दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्यासमोर ठेवली. हे समजल्यानंतर इमरानने ऐश्वर्याची माफी मागितली. "गिफ्ट हँपर जिंकण्यासाठी तेव्हा माझ्या डोक्यात जे आलं ते मी बोललो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी ऐश्वर्याचा मोठा प्रशंसक आहे आणि त्यात काही व्यक्तीगत घेण्यासारखं नव्हतं", असं तो म्हणाला. इमरानच्या माफीनंतरही हे प्रकरण तिथेच संपलं नाही. नंतर एका मुलाखतीत ऐश्वर्याने इमरानच्या वक्तव्याचा उल्लेख केला. "माझ्याबाबतची अत्यंत वाईट टिप्पणी मी कधी ऐकली असेन तर ती म्हणजे, मी खोटी आणि प्लास्टिक आहे", असं तिने म्हणून दाखवलं. 

इमरानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, त्याने 'मर्डर', 'जहर', 'आशिक बनाया आपने', 'कलयुग', 'अक्सर', 'गँगस्टर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'जन्नत', 'द डर्टी पिक्चर', 'मुंबई सागा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २००४ मध्ये इमरानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी २००२ मध्ये त्याने 'राज' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. सुरुवातीच्या काळात बरेच बोल्ड सीन दिल्यामुळे त्याची ओळख 'सीरिअल किसर' अशी झाली होती. मात्र नंतर त्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्याचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com