Anupamaa Hotstar
मनोरंजन

मालिकांचा TRP रिपोर्ट; 'आई कुठे काय करते'च्या हिंदी व्हर्जनची बाजी

पहा, कोणत्या मालिकांमध्ये रंगली आहे चुरस?

स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये दर आठवड्यात टीआरपीची TRP चुरस लागते. गेल्या काही आठवड्यांपासून 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेचं हिंदी व्हर्जन म्हणजेच 'अनुपमाँ' Anupamaa या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. रुपाली गांगुली, सुधांशू पांडे, गौरव खन्ना आणि मदालसा शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचं टीआरपी रेटिंग दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेला मिळालेल्या इम्प्रेशन्सचा आकडा हा ४.१ दशलक्षांवरून ४.३ दशलक्षांवर गेला आहे. टीआरपीच्या यादीत 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यामुळे गेल्या काही दिवसांत ते मालिकेत दिसले नाहीत. मात्र त्यामुळे टीआरपीवर फारसा परिणाम झालेला नाही. आयेशा सिंग, किशोरी शहाणे, भारती पाटील, शीतल मौलिक आणि इतर कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला ३.२ दशलक्ष व्ह्यूअरशिप इम्प्रेशन्स मिळाले आहेत.

सरगुन मेहता आणि रवी दुबे यांचा टीव्ही शो 'उदारियाँ' तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर गश्मीर महाजनी, मयुरी देशमुख आणि सुंबुल तौकीर यांची 'ईमली' ही मालिकासुद्धा तिसऱ्या स्थानी कायम आहे. या दोन्ही मालिकांना २.७ दशलक्ष व्ह्यूअरशिप इम्प्रेशन्स मिळाले आहेत. चौथ्या क्रमांकावर 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका आहे. तर 'ये है चाहते' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT