"माझे सर्व प्लॅन्स उद्ध्वस्त झाले"; घटस्फोटावर समंथाची प्रतिक्रिया | Samantha Ruth Prabhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu

"माझे सर्व प्लॅन्स उद्ध्वस्त झाले"; घटस्फोटावर समंथाची प्रतिक्रिया

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला Samantha Ruth Prabhu तिच्या घटस्फोटानंतर अनेक टीकांना सामोरं जावं लागलं. २ ऑक्टोबर रोजी समंथा आणि नाग चैतन्य Naga Chaitanya यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथावर अफेअर्स आणि गर्भपातासारखे गंभीर आरोप करण्यात आले. या सर्व टीकांवर समंथा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. "आमच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते नाराज झाले हे मी मान्य करते, मात्र त्यांची नाराजी व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असती तर बरं झालं असतं", असं ती म्हणाली.

'फिल्म कम्पॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत समंथा म्हणाली, "मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय यांच्यामध्ये मतभेद असू शकतात. मी जशी आहे तसंच चाहत्यांनी मला स्वीकारावं अशी माझी अपेक्षा नाही. त्यांना माझ्या काही गोष्टी खटकू शकतात. पण ती व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी हवी." येणाऱ्या नवीन वर्षात काय अपेक्षा असतील असा प्रश्न विचारला असता ती पुढे म्हणाली, "२०२१ मध्ये माझ्या खासगी आयुष्यात जे काही घडलं, ते पाहता मला येणाऱ्या नवीन वर्षाकडून काहीच अपेक्षा नाहीत. मी जे काही काळजीपूर्वक प्लॅन्स केले होते, ते सर्व उद्ध्वस्त झालं. आता भविष्यात माझ्या वाट्याला जे काही येईल, त्याला सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. मी परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाईन याची मला खात्री आहे."

हेही वाचा: '१४ वर्षांच्या सहवासात दोन पाहुणे घराबाहेरच ठेवले'; पत्नीसाठी अमोल कोल्हेंची खास पोस्ट

याआधीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित समंथाने ट्रोलिंगला उत्तर दिलं होतं. 'ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही अफवा पसरली आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत क्लेशकारक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत,' असं तिने लिहिलं होतं. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी समंथा आणि नाग चैतन्य विवाहबंधनात अडकले होते. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये गोव्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या 'बिग फॅट वेडिंग'ची चर्चा संपूर्ण कलाविश्वात होती.

Web Title: Samantha Ruth Prabhu On Split From Naga Chaitanya Saif All Her Carefully Laid Plans Have Crumbled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..