मनोरंजन

'शिल्पाला कोणत्या नरकातून जावं लागलं, याची कल्पना नाही करु शकत'

दिग्दर्शक अनुराग बासू यांनी सांगितला सेटवरचा अनुभव

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणी व्यावसायिक व पती राज कुंद्राला Raj Kundra अटक झाल्याच्या जवळपास महिनाभरानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty कामावर परतली. 'सुपर डान्सर ४' Super Dancer 4 या रिअॅलिटी शोमध्ये दिग्दर्शक अनुराग बासू Anurag Basu आणि कोरिओग्राफर गीता कपूरसोबत शिल्पा परीक्षक म्हणून काम करत आहे. 'सुपर डान्सर ४'च्या सेटवर परतल्यानंतर शिल्पाच्या अवतीभोवती कसं वातावरण होतं, याविषयी अनुराग बासूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाले, "सेटवर शिल्पा परत येताच आम्ही सर्वांनी तिला मिठी मारली. तिला आम्ही कोणतेच प्रश्न विचारले नव्हते. कारण आधीच ती अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करून सेटवर परतली होती. तिला कोणत्या नरकातून जावं लागलं, याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. गीता, मी आणि शिल्पा..आम्हा तिघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. सेटवर आमच्यात छोटीमोठी भांडणं पण होतात. पण आम्हाला नेहमीच एकमेकांची काळजी असते. शिल्पा आणि गीतासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं आणि त्यामुळेच मी प्रत्येक एपिसोडची आतुरतेने वाट पाहत असतो."

राजला अटक झाल्यानंतर शिल्पा मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. त्याचा परिणाम शिल्पाच्या सोशल लाईफवर झाल्याचंही दिसून आलं. शिल्पाकडे जे काही रियॅलिटी शो होते त्यातून तिला बाहेर जावं लागलं होतं. राजच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तिला त्या पदावरुन माघार घ्यावी लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT