'मी चुकले पण..'; शिल्पा शेट्टीची पोस्ट व्हायरल

इन्स्टा स्टोरीमध्ये शिल्पाची चुकांविषयी पोस्ट
shilpa
shilpa

अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणी पती व व्यावसायिक राज कुंद्राच्या Raj Kundra अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty जवळपास महिनाभर सोशल मीडियापासून दूर होती. शिल्पाने आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली असून सोशल मीडियावरही ती सक्रिय झाली आहे. गुरुवारी रात्री तिने इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. एका पुस्तकातील पानाचा फोटो तिने स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. 'चुका या आपल्या आयुष्याचाच एक भाग असतात', असं सोफिया लॉरेन यांचं विधान या पोस्टच्या सुरुवातीला पहायला मिळतंय. या पोस्टवर एक स्टिकर असून त्यावर 'मी चुकले पण ठीक आहे' असं लिहिलेलं दिसतंय. शिल्पाने हे स्टिकर पोस्ट केलंय.

काय आहे शिल्पाची पोस्ट?

'काही चुका केल्याशिवाय आपलं आयुष्य रंजक होऊ शकत नाही. त्या चुका धोकादायक असू नयेत किंवा त्या चुकांनी इतरांना दुखवू नये. पण चुका या होणारच. ज्या गोष्टींना आपण विसरू पाहतो अशा गोष्टींमध्ये आपण चुकांना पाहतो. पण एक आव्हानात्मक, रंजक अनुभव म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. कारण त्यामधून आपण बरंच काही शिकू शकतो', असं या पानावर लिहिलंय. 'मी चुका करणार. मी स्वत:ला माफ करणार आणि झालेल्या चुकांमधूनच शिकणार', अशी ओळ या पोस्टच्या शेवटी आहे.

shilpa
आई कुठे काय करते: १४ वर्षांनंतर मिलिंद गवळींची 'त्या' बालकलाकाराशी भेट

राजच्या अटकेनंतर शिल्पा 'सुपर डान्सर ४' या रिअॅलिटी शोच्या मंचावर गैरहजर राहिली. मात्र आता पुन्हा एकदा तिने कामाला सुरुवात केली आहे. शिल्पाचे सेटवरील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com