Apurva Nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie cast om bhutkar release date 12 may sakal
मनोरंजन

Apurva Nemlekar: किलर लुक! ‘रावरंभा’ चित्रपटात अपूर्वा नेमळेकर साकारतेय 'शाहीन आपा'

‘रावरंभा’ चित्रपटात दिसणार अपूर्वाचा अनोखा अंदाज..

नीलेश अडसूळ

Apurva Nemlekar in ravrambha movie: आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावाने कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवीन काय घेऊन येणार? याची उत्सुकता कायमच तिच्या चाहत्यांना असते.

वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा आता एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे.

आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार आहे येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे.

(Apurva Nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie cast om bhutkar release date 12 may)

निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

‘शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी ‘शाहीन आपा’ अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना अपूर्वा सांगते, ‘ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.

शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत.

गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. १२ मे ला 'रावरंभा' प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT