ashok saraf emotional hug with nana patekar after watch ole aale marathi movie SAKAL
मनोरंजन

Nana Patekar - Ashok Saraf: 'ओले आले' पाहून अशोक सराफ यांचे डोळे ओलावले! व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर - अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Ole Aale Movie News: नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ओले आले सिनेमा ५ जानेवारीला रिलीज झालाय. या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासोबतच सायली संजीव - सिद्धार्थ चांदेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

ओले आलेचा प्रीमियर शुक्रवारी मुंबईत पार पडला. मुंबईतील फन सिटी मॉलमध्ये हा प्रिमीयर पार पडला. या प्रीमियरच्या वेळी सिनेमा पाहून बाहेर आल्यावर अशोक सराफ - नाना पाटेकर यांनी एकमेकांना मिठी मारली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

नाना - अशोक सराफ यांनी मारली एकमेकांना मिठी

सोशल मीडियावर अशोक सराफ - नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत ओले आले पाहिल्यानंतर अशोक सराफ बाहेर आले आणि त्यांनी नानांना कडकडून मिठी मारली.

त्यांनी नानांचा हात हातात घेतला आणि भरभरुन कौतुक केलं. नानांच्या गालावर हात ठेऊन त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. नानांनी सुद्धा नम्रपणे अशोक यांच्या कौतुकाचा स्वीकार केला. या दोघा दिग्गज अभिनेत्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

नाना आणि मकरंद यांचा नवीन सिनेमा ओले ओले

नानांचा 'ओले आले' सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमात एक अशा प्रवासाची गोष्ट पाहायला मिळतेय जी जगण्याचं सूत्र शिकवतेय! 'ओले आले' असं कॅप्शन देत काही दिवसांपुर्वी नाना पाटेकरांच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.

विशेष गोष्ट म्हणजे हा सिनेमा लोकांना खळखळुन हसवतोय यात काही शंका नाही. याशिवाय या सिनेमाच्या माध्यमातुन नाना पाटेकर अनेक वर्षांनी हलक्या फुलक्या विनोदी भुमिकेत दिसत आहेत.

ओले ओले सिनेमातले कलाकार

ओले आले मध्ये नाना पाटेकर - मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

याशिवाय या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव सुद्धा खास भुमिकेत दिसणार आहेत.

ओले आले हा सिनेमा ५ जानेवारी २०२४ रोजी सर्वांच्या भेटीला आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT