Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा द व्हॅक्सीन वॉर हा आता प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
Nana Patekar And Rishi Kapoor
Nana Patekar And Rishi Kapooresakal

Nana Patekar The Vaccine War Actor share Rishi Kapoor : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा द व्हॅक्सीन वॉर हा आता प्रेक्षकांच्या भेटीला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या व्हॅक्सीन वॉरमध्ये कोविडच्या वेळची परिस्थिती आणि भारतीय वैज्ञानिकांचा संघर्ष यांची मांडणी करण्यात आली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

नाना पाटेकर या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. त्यात त्यांनी बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अभिनेते यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली होती. त्यांनी किंग खान शाहरुख आणि सनी देओल यांच्या चित्रपटावरही आगपाखड केली होती. याशिवाय कंटेट आणि मनोरंजन यातील फरक त्यांनी समजावून दिला होता. कलाकार म्हणून आपली जबाबदारी काय हे ओळखण्याची गरज आहे. असे नानांचे म्हणणे होते.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

यासगळ्यात आता नाना पाटेकर हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. नाना पाटेकर यांनी ऋषी कपूर यांचा एक किस्सा शेयर केला आहे. नाना आणि ऋषी कपूर हे हम दोनो चित्रपटामध्ये सर्वात प्रथम एकत्र आले होते. प्रेक्षकांना अजूनही त्यांच्या जोडीविषयीच्या आठवणी माहिती आहेत. नाना आणि ऋषी कपूर यांच्यात निखळ मैत्री होती. नानांना जेव्हा बॉलीवूडमधील कोणत्या सेलिब्रेटींसोबत तुमची मैत्री आहे असे विचारण्यात आले त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय आहे.

नाना म्हणाले, ऋषी कपूर, अनिल कपूर आणि डॅनी डेजोंप्पा हे माझे खास मित्र. ऋषी कपूर यांच्याविषयी सांगायचे झाल्यास ते खूपच प्रभावी व्यक्तिमत्व होते. एकदा ते माझ्या घरी दारुची बाटली घेऊन आले होते आणि मला म्हणाले, विश्वास बसत नाही की, तुझ्या घरी दारुची बाटली नाही. त्यादिवशी मी खिमा आणि चपाती बनवली होती. तेव्हा त्यांच्यासोबत नीतू कपूर नव्हती.

Nana Patekar And Rishi Kapoor
Fukrey 3 Twitter Review: 'चुचा'ची जादुई शक्ती करणार का काम? फुक्रे पाहून काय म्हणाली लोकं?

मीच एकदा नीतूला म्हणालो होतो की, मी कधीही तुमच्या घरी येणार नाही. तेव्हा नीतू ऋषी कपूरला घेऊन माझ्या घरी आली आणि आम्ही जेवण केले होते. ऋषी म्हणाले होते की, तू कलाकार म्हणून ठीक आहेस पण शेफ म्हणून कमाल आहेस. मी तुझ्यासाठी एक हॉटेल सुरु करतो. नाना म्हणाले, ऋषी कपूर एक अद्भुत व्यक्तिमत्वाचे होते. त्यांचे जाणे मनाला चटका लावून जाणारे होते.

Nana Patekar And Rishi Kapoor
Shah Rukh Khan : 'विराट कोहली जावई आहे आपला'! किंग खान असं का म्हणाला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com