Ayodhya Ram Mandir Inauguration Only Five Bollywood Celebrities invited Skip Kangana ranaut  SAKAL
मनोरंजन

Ayodhya Ram Mandir Inaguration: बॉलीवूडच्या फक्त पाचच सेलिब्रेटींनी निमंत्रण, चक्क कंगनाचं नाव वगळलं

अयोध्या राम मंदिराच्या उद्धाटनाला बड्या सेलिब्रिटींना आमंत्रण पण कंगनाला नाही

Devendra Jadhav

Ayodhya Ram Mandir Inauguration News: अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठास्थापना लवकरच होणार आहे. संपूर्ण भारतवासी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अयोध्येत नव्याने बांधलेल्या रामलल्लाची मूर्तीचे 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादीत 3 हजार व्हीव्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या सेलिब्रिटींना राम मंदिर उद्धाटनाचं आमंत्रण

विश्वस्त सुत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. ट्रस्टने ३,००० व्हीव्हीआयपींसह ७,००० लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. या आमंत्रितांमध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनोरंजन विश्वातून निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

याशिवाय इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आशा भोसले यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. परंतु या यादीत कंगना रणौतला आमंत्रण नाही.

पंतप्रधान मोदींसह या सेलिब्रिटींचा समावेश

22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आमंत्रितांच्या यादीत दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह सुमारे सात हजार लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत.

कसा असणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रम?

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना यादीत ३ हजार व्हीव्हीआयपींसह ७ हजार लोकांची नावे आहेत. सेलिब्रिटींशिवाय 1992 मध्ये मृत्युमुखी पडलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, योगगुरू राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती गौतम अदानी हेही सहभागी होणार आहेत.

नवीन राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासुन या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheesy Popeye Poppers Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून चीजने भरलेले; पालक आणि काळ्या चण्यांपासून बनवा झटपट स्नॅक्स

आजचे राशिभविष्य - 21 ऑक्टोबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑक्टोबर 2026

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

SCROLL FOR NEXT