Bangladeshi actress Humaira Himu dies MYSTERIOUSLY at a hospital police investigation  SAKAL
मनोरंजन

Humaira Himu: प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या ३७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पोलिसांना प्रियकरावर संशय

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अकस्मात मृत्युने सर्वांना धक्का बसलाय

Devendra Jadhav

Humaira Himu News: प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा हिमुचं निधन झालंय. अभिनेत्रीच्या निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हुमैरा हिमूच्या निधनाने सर्वजण शोक करीत आहेत.

वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हुमैरा हिमूने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. तसेच सर्वजण त्याच्यावर शोक व्यक्त करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर संशय घेतला असल्याचं उघड झालंय.

हुमैराच्या मानेवर निशाण, पोलिसांचा प्रियकरावर संशय

News24Online च्या वृत्तानुसार, 2 नोव्हेंबर रोजी हुमैराला उत्तरा मॉडर्न मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इतकंच नाही, तर अॅक्टर्स इक्विटी असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितलं की, तिच्या मानेवर मारहाण केल्याची खूण दिसल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं. पोलिस येण्यापूर्वीच तिचा मित्र हॉस्पिटलमधून निघून गेला होता. त्यामुळे हुमैराच्या मित्रावर पोलिसांनी संशय व्यक्त करत असुन ते त्याचा शोध घेत आहेत.

हुमैराची हत्या की आत्महत्या!

पोलिसांनी दिलेल्या पुढील अहवालात म्हटले आहे की, अभिनेत्रीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आता पोस्टमॉर्टम केले जाईल. तसेच हुमैराचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

2 नोव्हेंबर रोजी दुपारी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित करण्यापूर्वीच तिचा प्रियकर पळून गेल्याचा संशयही पोलिसांना आहे. (Latest Marathi News)

गाजलेल्या सिनेमांमधून हुमैराने केलं काम

2006 मध्ये एका टेलिव्हिजन मालिकेद्वारे तिने हुमैराने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. याशिवाय हुमैराने 2011 मध्ये 'अमर बंधू रशीद' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

'बारी बारी सारी सारी', 'हाऊसफुल', 'गुलशन एव्हेन्यू'सह अनेक टीव्ही नाटकांमध्ये हुमैरा झळकली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT