Amala Paul and Jagat Desai announce pregnancy with adorable baby bump pics SAKAL
मनोरंजन

Amala Paul: 'भोला' फेम ३२ वर्षीय अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज

अजय देवगणसोबत 'भोला' सिनेमात काम केलेली अमला पॉल आई होणार आहे

Devendra Jadhav

Amala Paul Pregnancy News: अजय देवगणच्या भोला सिनेमात काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल आणि जगत देसाई यांनी काहीच महिन्यांपुर्वी एकमेकांशी लग्न केलं. केरळमधील कोची येथे ५ नोव्हेंबरला अमला आणि जगत यांचा विवाहसोहळा पार पडला.

आता या दोघांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे. ३ जानेवारीला दोघांनी ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. दोघांनी त्यांच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमधील आकर्षक फोटो शेअर केले आहेत. तिचे चाहते आणि मित्र या जोडप्याला त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

अमला पॉल आणि जगत देसाई होणार आई - बाबा

अमला पॉल आणि जगत देसाई यांचा 26 ऑक्टोबर 2023 रोजी साखरपुडा झाला होता. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारीला अमला आणि जगत यांनी ते आई - बाबा होणार असं जाहीर केलं.

सोशल मीडियावर अमलाने तिच्या बेबी बंपचे खास फोटो शेअर केले आहेत. "आता मला माहित आहे की 1+1 = 3 हे तुझ्यासोबक आहे!" असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले.

अमला पॉल आणि जगत देसाई थोडंसं....

अमला पॉल ही तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ती शेवटची मामूटीच्या 'क्रिस्टोफर'मध्ये दिसली होती. याशिवाय अजय देवगणच्या 'भोला'मध्ये तिने विशेष भूमिका साकारली होती.

ती आता पृथ्वीराज आणि दिग्दर्शक ब्लेसी यांच्या 'आदुजीविथम' या आगामी सिनेमात झळकणार आहे. याशिवाय आसिफ अली श्राफुदीनचा 'लेव्हल क्रॉस' याही सिनेमात सुद्धा झळकणार आहे.

जगत देसाई हा गोव्यात व्हिला विक्रीचा व्यवसाय करतो. नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न करण्यापूर्वी अमला आणि जगत एकमेकांना अनेक महिने डेट करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT