Ranbir Kapoor - Rohit Shetty: झुपकेदार मिशी - खाकी वर्दी, रणबीर कपूर रोहित शेट्टीसोबत आगामी प्रोजेक्टमध्ये

रणबीर कपूर रोहीत शेट्टीसोबत आगामी प्रोजेक्टमध्ये अभिनय करणार आहे.
ranbir kapoor police cop look viral upcoming project with rohit shetty
ranbir kapoor police cop look viral upcoming project with rohit shettySAKAL

Ranbir Kapoor - Rohit Shetty New Ad News: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'अ‍ॅनिमल' रिलीज होऊन आता एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला आहे, तरीही सिनेमाची क्रेझ काही कमी होत नाहीय.

अशातच रणबीरच्या आगामी प्रोजेक्टची झलक दिसून आलीय. या प्रोजेक्टमध्ये रणबीर पोलीस ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर - रोहित शेट्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ranbir kapoor police cop look viral upcoming project with rohit shetty
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लेक अखेर लग्नबंधनात! आयरा-नुपूरचं मराठमोळ्या थाटात पार पडलं शुभमंगल

रणबीरचे पोलीस अधिकाऱ्याच्या लूकमधील अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो रणबीरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एका फोटोत रणबीर खुर्चीवर बसून शॉटची वाट पाहत असतो. तर एका फोटोमध्ये रणबीर दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत उत्साहात फोटोसाठी पोझ देताना दिसतो. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: "आरके आणि रोहित शेट्टी एका जाहिरात शूटसाठी."

रणबीरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या लूकला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. रोहित शेट्टी पोलिसांच्या आयुष्यावर सिनेमे बनवण्यासाठी चांगला तरबेज आहे.

पण यावेळी मात्र रणबीरसोबत रोहित एका आगामी जाहिरातीच्या प्रमोशनसाठी एकत्र आलाय. रोहित - रणबीरला फक्त जाहिरातीत नव्हे तर सिनेमात सुद्धा एकत्र पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com