Big Boss 13  
मनोरंजन

Big Boss 13 : 'या' सदस्यावर सनी लिओनी केले होते गंभीर आरोप

वृत्तसंस्था

मुंबई : बिग बॉसच्या घरामध्ये कधी काय होइल हे काही सांगता येणार नाही. प्रचंड लोकप्रियता या शोला लाभली असली तरी मात्र खेळाचा फॉरमॅट आणि नियम यांमुळे बिग बॉसचं घर नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. शिवाय घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर आणि मतभेद लोकांमध्ये अधिक रस निर्माण करतं. यावेळेचं बिग बॉस पर्व इतर पर्वांपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरलं आहे. या घरातील एका पुरुष सदस्यावर अभिनेत्री सनी लिओनीने गंभीर आरोप लावले होते अशी माहिती समोर आली आहे. 

या सदस्याचं नाव पारस छाबडा असं आहे आणि त्याच्यावर सनीने यापूर्वी विनयभंगाचा आरोप केला होता. सध्या इंटरनेटवर याची चर्चा होताना दिसत आहे. पारस हा नेहमीच मुलींच्या घोळक्यात किंवा घरातील कोणत्यातरी मुलीसोबतच आढळतो. यापूर्वी घरातील सदस्य शहनात गील आणि माहिरा शर्मा यांच्यासोबतही पारसचे भांडण झाले होते. नुकतचं एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सनी लिओनीनेसुद्धा पारसवर गंभीर आरोप केले होते अशी माहिती समोर आली. 

MTV चॅनेलवरील 'स्प्लिट्सव्हिला' या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन सनी करते. याच शोच्या आठव्या सिझनदरम्यान पारस शुटिंगच्यावेळी अनेकदा सनीच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करीत असे. शोमधील इतर सदस्यांशी सनी जेव्हा बातचीत करत असे तेव्हा पारस सनीवर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. जेव्हा पारसने सनीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने अखेर शोच्या निर्मात्यांकडे याविषयाची तक्रार केली. या सर्व प्रकारानंतर सनीचा पती डॅनियल वेबर हा शोच्या सेटवर येऊ लागला. त्यामुळे सनीशी गैरवर्तन किंवा बोलण्याची कोणाची हिंमत होत नसे. त्यानंतरही पारस थांबला नाही आणि त्याने गैरवर्तन चालूच ठेवले. अखेर सनीने 'स्प्लिट्सव्हिला' शोच्या निर्मात्यांकडे पारसला पुन्हा न बोलवण्याची विनंती केली. 

बिग बॉसच्या घरामध्ये पारसला इतर सदस्य 'दिल फेक' अशा नावाने चिडवतात. शिवाय 'विकेंड का वार' च्या दिवशीही याविषयी चर्चा करण्यात आली होती. या आठवड्यामध्ये पारसशिवाय सिद्धार्थ डे, अबु मलिक, असीम रियाज, रश्मी देसाई आणि माहिरा शर्मा हे सदस्य नॉमिनेटेड आहेत. याच आठवड्यामध्ये नॉमिनेटेड सदस्यांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन सदस्य घरातून बाहेर पडतील. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT