Salman Khan With Big boss contestants. Google
मनोरंजन

'बिग बॉस'चा आवाज कोरोना पॉझिटिव्ह!

संपर्कात असलेल्या घरातील सदस्यांपासून सेटवरील क्रु मेंबर्सची कोरोना टे्स्ट करण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

कोरोनाची तिसरी लाट वेगानं पसरतेय. रविवारी एका दिवसात संपूर्ण देशात जवळपास पावणे दोन लाखांपर्यंत कोरोना बाधितांची संख्या पोहोचली होती. सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनानं नामोहरम केलंय. मनोरंजन सृष्टींन आता कुठे वेग पुन्हा पकडला होता त्याला पुन्हा ब्रेक लागणार का अशा चर्चांना उधाण आलंय. आधीच मोठमोठ्या निर्मात्यांनी आपल्या बिग बजेट सिनेमांचं चित्रिकरण,प्रदर्शन पुढे ढकललं आहे. त्यात आता अनेक टेलिव्हिजन स्टारही कोरोनाबाधित होत असल्यामुळे डेली सोपच्या शुटिंगमध्येही व्यत्यय येत आहे. 'बिग बॉस' सारख्या शो ला ही कोरोनानं आपल्या लपेट्यात घेतलं आहे. खुद्द 'बिग बॉस' लाच कोरोना झाल्याची बातमी आहे.

आता 'बिग बॉस' या शो चं रहस्य आहे ते म्हणजे 'बिग बॉस' कोण याबाबतीत सांभाळली गेलेली गुप्तता. त्यामुळे अर्थातच 'बिग बॉस' म्हणून ज्या व्यक्तीचा आवाज ऐकू येतो ती व्यक्ती नेमकी कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. कोण बरं घरावर,घरातील सदस्यांवर आपल्या आवाजाच्या माध्यमातून दरारा ठेवून असतो. तर असे हिंदी 'बिग बॉस' शो चे 'बिग बॉस' आहेत अतुल कपूर. ज्यांच्यावर सध्या बिग बॉसच्या घरात असलेली तेजस्वी प्रकाश फीदा आहे. त्यांचा आवाज तिला प्रचंड मोहक वाटतो. ती लाडानं 'बिग बॉस' ला 'बेबी' म्हणूनही संबोधते. /याच अतुल कपूर यांना कोरोना झाल्यामुळे क्वारंटाईन करण्यात आलंय. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सेटवरील क्रु मेंबर्सचीही कोरोना चाचणी करण्यात आलीय.

आता 'बिग बॉस' क्वारंटाईन झाल्यामुळे 'बिग बॉस' बदलणार की शो थांबवणार काही काळासाठी?अशा अनेक चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या घरातील सदस्य देबोलिनामध्ये कोरोनाची लक्षणं जाणवल्यामुळे तिला क्वारंटाईन ठेवून सर्व सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. तसंच आता 'बिग बॉस' कोरोना बाधित असल्यामुळे सेटवरील सर्वांची तपासणी करण्यात आली. रीपोर्ट्स अद्याप कळालेले नाहीत. पण जर सर्वच जणं कोरोना बाधित झाले असले तर मग नक्कीच शो थांबवावा लागणार यात शंकाच नाही. पण या बातमीवर अनेक फॅन्सनी शोच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. उमर रियाझला शो बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे त्याच्या फॅन्सनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'भोगा आपल्या कर्मांची फळं' 'तुम्हाला फॅन्सची हाय लागली' अशा पद्धतीच्या विरोध दर्शवणा-या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil India Andaman Gas: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडलं ऊर्जेचं भांडार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

Women Deportation: ‘विदेशी’ ठरवलेल्या महिलांच्या हकालपट्टीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर, प्रकरण काय?

Deglur Lightning Strike : वीज कोसळून गोठ्याला आग; २२ शेळ्या, १५ पिल्ले व २० कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे आठ लाखांहून अधिक नुकसान

IND vs AFG: ६ जूनच्या कसोटीपूर्वी गंभीरचं धक्कादायक विधान; म्हणाला, "सध्या भारतीय संघाकडून जास्त अपेक्षा..

Sahyadri Sugar Factory : सह्याद्री बचाव समितीचा कारखाना प्रशासनाला इशारा; अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT