'मला भीती वाटते'असं सिद्धार्थ चांदेकर का म्हणाला? Siddhartha Chandekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Chandekar

'मला भीती वाटते'असं सिद्धार्थ चांदेकर का म्हणाला?

पडद्यावर नेहमीच हसतमुख,हॅप्पी गो लकी,मनमोकळ्या स्वभावाचा सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) प्रत्यक्षात कसा आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल न? 'ईसकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थनं अनेक विषयांवर दिलखुलास संवाद साधलाय. अगदी त्याच्या सिने करिअरपासून पर्सनल लाईफ पर्यंत सगळ्याच विषयांवर त्यानं गप्पा मारल्या आहेत. स्पृहा जोशी आणि कश्यप परुळेकरसोबतचा त्याचा 'कॉफी' सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. त्यानिमित्तानं सिनेमाविषयी सांगतानाच तो त्याच्या 'कॉफी' प्रेमाविषयीही भरभरुन बोललाय. त्यानं अनेक असे मुंबई-पुण्यातले त्याचे फेव्हरेट अड्डे आणि तिथले गमतीदार 'कॉफी'चे किस्से या मुलाखतीत सांगितले आहेत.

हेही वाचा: जॅकलिन अन् सुकेशचा 'किस''लव्हबाईट्स'चा नवीन फोटो व्हायरल...

अॅक्टिंगपेक्षा इतर कोणत्या गोष्टींवर आपलं प्रेम आहे याविषयीही त्यानं मन की बात सांगितली आहे. त्याच्या त्या हटके गोष्टी ऐकाल तर तुम्हालाही नवल वाटेल. त्यानं आपली बायको अभिनेत्री मितालीचे एका गोष्टीविषयी धन्यवाद मानलेयत कारण त्या गोष्टीचं महत्त्व केवळ मितालीमुळे आपल्याला कळलं,त्या गोष्टींची आपल्याला मितालीमुळे आवड लागली असं तो म्हणाला. आयुष्यात कोणत्या गोष्टींची भीती आपल्या मनात घर करून आहे यावरही अभिनेत्यानं बोलताना हातचं काही राखून न ठेवता संवाद साधला. त्यासाठी या बातमीत त्याची आम्ही पॉडकास्ट मुलाखत इथे जोडलेली आहे,ती नक्की ऐका.

सिद्धार्थ चांदेकरची ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका. धमाल किस्से,पडद्यामागच्या गमती जमती आणि वैयक्तिक आयुष्यातल्या बायकोसोबतच्या गमतीजमतींची ही पॉडकास्ट मेजवानी आवडेल आपल्याला.

'अग्निहोत्र' मालिकेपासून सुरू झालेल्या सिद्धार्थचा प्रवास तसा पाहिला तर यशस्वी राहिलाय. त्यानं मालिका,सिनेमा,हिंदी वेब सिरीज,नाटक अशा विविध प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. तसंच या मुलाखतीत त्यानं आपल्या बायकोसोबतच्या नात्यावरही छान गप्पा मारल्या आहे. सोशल मीडियावर त्या दोघांच्या वायरल झालेल्या पालीच्या व्हिडीओमागचा धम्माल किस्साही त्यानं या मुलाखतीत सांगितलाय. तो ऐकून हसून हसून लोटपोट नं झालात तर नवल म्हणावे लागेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top