Bigg Boss 17: Orry to enter the Bigg Boss house - Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: 9 लाखाचं घड्याळ, 5 लाखाचे शूज अन् बरंच काही... श्रीमंतीत जगणारा ओरी झाला बिग बॉसच्या घरात लॉक!

अलीकडेच ओरीने सलमान खानच्या शो 'बिग बॉस 17' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे.

Vaishali Patil

Orry in Bigg Boss 17:  वादग्रस्त टीव्ही शो 'बिग बॉस 17' सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये आता अनेक ड्रामा आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे या शो ची टीआरपी दिवसेंदिवस वाढत आहे.

आता या घरातून चार स्पर्धक बाहेर पडले आहेत तर त्यानंतर बिग बॉसच्या घरात एका नव्या स्पर्धकाची एंट्री झाली आहे.

वाइल्डकार्ड स्पर्धकाबद्दल सोशल मिडियावर खुप चर्चा होती. आता सलमाननं वीकेंड का वार मध्ये ओरहान अवतारमणी उर्फ ​​ओरी याला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एंट्री दिली आहे.

कलर्स चॅनलने शोचा एक प्रोमो सोशल मिडियावर शेयर केला आहे. ज्यात सलमान खान त्याच्या शोमध्ये ओरीचे स्वागत करत आहे. मात्र यावेळी ओरी एकटाच या घरात आला नाही तर सोबत सात- आठ बॅग घेऊन आला. यावर सलमान खान त्याची थट्टाही करतो.

सलमान त्याला म्हणतो की, 'आम्ही स्पर्धकाला या शोमध्ये सन्मानाने पाठवतो पण तुला सामानाने पाठवावं लागत आहे. संपूर्ण जगाला जाणून घ्यायचं आहे की तू काय काम करतोस'

यावर ओरी सांगतो की तो खुप मेहनत करतो आणि काम करतो. तो सकाळी सूर्यासोबत उठतो आणि रात्री चंद्रासोबत झोपतो. ओरीचं बोलणं ऐकल्यानंतर सलमानला हसू आवरत नाही,

तर पुढे सलमान विचारतो की, लोकांना जाणुन घ्यायचं आहे की मोठमोठया पार्टीमध्ये जाण्यासाठी के लोक तूला पैसे देतात का?

तर ओरी यावर म्हणतो की, " मला पैसे मिळत नाहीत उलट तेच माझ्या मॅनेजरला फोन केल्यानंतर लोक मला फोन करतात. माझ्याकडे 5 मॅनेजर आहेत.

इतकच नाही तर ओरीकडे 9 लाख 80 हजार किमतीचे घड्याळ, 1.5 लाख किमतीचे बूट आणि 5 मॅनेजर आहेत. ओरी खुप विलासी जीवन जगतो. शोमध्ये येतानाही तो खुप सामान घरात घेऊन गेला आहे. मात्र आता इतकं विलासी जीवन जगणारा ओरी बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसोबत जमवून घेऊ शकेल का हे आता काही दिवसांत कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT