Bigg Boss 17 Vicky Jains Mother Screams At Ankita Lokhande Over Throwing Chappal At Him Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: माझ्या लेकाला चप्पल मारून फेकली! सासूबाई अंकितावर भडकली!

Vaishali Patil

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता घरातून चार स्पर्धक बाहेर गेले आहेत. तर एका नवीन स्पर्धकाची घरात एंट्री झाली आहे.

बिग बॉसच्या घरात यंदा दम, दिल आणि दिमाग अशी तीन घरं विभागली गेली आहे. यात वेगवेगळे स्पर्धक राहत आहे.

तर घरात अनेक प्रेम प्रकरणही सुरु झाली आहे. ज्यात समर्थ आणि इशाचं नाव आघाडीवर आहे. तर मन्नारा आणि मुनव्वर यांच्या नावाचीही चर्चा आहे.

तर दुसरीकडे घरात दोन कपल देखील सहभागी झाले आहेत. ज्यात नील- ऐश्वर्या आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे- विकी जैन यांचा सामावेश आहे. अंकिता आणि विकीची जोडी सुरुवातीला प्रेक्षकांना खुपच आवडली होती.

मात्र आता हे पती-पत्नी प्रेमापेक्षा भांडणांमुळेच जास्त चर्चेत असतात. दोघांमध्येही खुप वाद सुरु आहेत. तर आता या दोघांमधील वाद कमी करण्यासाठी बिग बॉसने घरात त्यांच्या आईला बोलवले आहे.

शोच्या नवीन प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे आपापल्या आईला पाहून दोघीही भावूक झाले. यादरम्यान विकी आपल्या आईला पाहून भावूक होतो आणि रडू लागतो. आपल्या मुलाला रडताना पाहून विकीच्या आईला देखील खूप रडू येतं आणि ती अंकितावर खूप चिडते. यावेळी अंकिताची आई त्यांना समजावते की खेळ खेळून मजबूत होऊन बाहेर या. असं भांडू नका.

आईला पाहून विकीच्या डोळ्यात पाणी आल्यावर अंकिता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. विकी म्हणतो- आई, सर्वजण मला चुकीचं समजतात. विकीची आई त्याला गप्प बसायला सांगते. मग ती अंकिता आणि विकीला म्हणते की, तुम्ही घरात कधी भांडले नाहीत. इथे किती भांडत आहात. अंकिता लाथ मारतेय, चप्पल मारतेय.

तेव्हा अंकिता म्हणते की आई, मी इथे आहे, मी काळजी घेईन त्यावर विकीची आई चिडते आणि म्हणते- नाही, तू त्याला नीट सांभाळत नाही आहेस. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून अंकिता आणि विकीचे चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

Jantar Mantar: देशातल्या 'या' शहरांमध्ये आहे दिल्लीसारखं जंतर-मंतर! वाचा वेधशाळांचा रंजक इतिहास!

Latest Marathi News Update : मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज

Koyna Dam: कोयना धरणात २४ तासांत ३ टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा ७५ टीएमसीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

SCROLL FOR NEXT