Adish Vaidya 
मनोरंजन

'बिग बॉस मराठी ३'मधून आदिश वैद्यची एग्झिट!

आदिशच्या एग्झिटवर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी सिझन ३च्या गेल्या आठवड्यातील चावडीवर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील दोन लोकप्रिय सदस्यांनी हजेरी लावली. पहिल्या पर्वाची विजेती  मेघा धाडे आणि रेशम टिपणीस या दोघींनी सदस्यांचं भरभरून कौतुक केलं. तर काही सदस्यांना ते कुठे चुकत आहेत ते देखील सांगितलं. उत्कर्ष आणि सोनाली पाटीलने बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOTद्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. बिग बॉसच्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणं अनिवार्य असणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये मीनल शाह, विकास पाटील, संतोष चौधरी (दादुस) आणि आदिश वैद्य हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. या चार जणांपैकी वाइल्ड कार्डद्वारे आलेल्या आदिश वैद्यला Adish Vaidya बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागलं.

आदिश वैद्य हा वाईल्ड कार्डद्वारे घरामध्ये आला होता. त्याच्या एण्ट्रीमुळे घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेलं होतं. आदिशच्या एग्झिटमुळे मीनल शाह भावूक झाल्याचं पहायला मिळालं. आदिशने कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकांमध्ये काम केले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली. आदिश त्याच्या लव्ह-लाईफमुळेदेखील सोशल मीडियावर चर्चेत असतो.

आता या आठवड्यात महेश मांजरेकर यांनी केलेल्या कानउघडणीचा सदस्यांवर काही परिणाम होणार का, नवा कॅप्टन कोण बनणार, कोणते सदस्य नॉमिनेट होणार, कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT