'हिंदू असल्याची मला लाज वाटते'; नमाजचा व्हिडीओ पाहून संतापली स्वरा भास्कर | Swara Bhasker | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara  Bhaskar

'हिंदू असल्याची मला लाज वाटते'; नमाजचा 'तो' व्हिडीओ पाहून संतापली स्वरा भास्कर

अभिनेत्री स्वरा भास्कर Swara Bhasker नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी आणि बेधडक मतांसाठी ओळखली जाते. ट्विटरच्या माध्यमातून ती तिचं मतं मोकळेपणे मांडते आणि त्यामुळे अनेकदा ती ट्रोलिंगची शिकार होते. नुकतंच तिने एका व्हिडीओवर तिची प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'मी हिंदू असल्याची मला लाज वाटते', असं तिने ट्विटरवर लिहिलं आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांची मतमतांतरे पहायला मिळत आहेत.

काय आहे प्रकरण?

गुरुग्राममध्ये शुक्रवारी मुस्लिम समुदायाची काही लोकं नमाज पठण करत होते. अचानक त्याठिकाणी काही लोकांचा जमाव पोहोचला आणि नमाज पठण करणाऱ्यांसमोर ती लोकं 'जय श्री राम'ची घोषणाबाजी करू लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर स्वराने प्रतिक्रिया दिली आहे. 'हिंदू असल्याची मला लाज वाटत आहे', असं तिने लिहिलं. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

हेही वाचा: 'हे मी सहन करणार नाही'; क्रांती रेडकरने खोटं वृत्त देणाऱ्यांना सुनावलं

'या ट्विटसाठी तुला किती पैसे मिळाले', असा प्रश्न एका नेटकऱ्याने स्वराला विचारला. तर 'तू हिंदू आहेस या गोष्टीची आम्हाला लाज वाटते', अशा शब्दांत दुसऱ्याने टीका केली. अनेकांनी हे ट्विट हिंदूंविरोधी असल्याचं म्हणत स्वराला सुनावलं. तर काहींनी तिला थेट धर्म बदलण्याचा सल्ला दिला.

ट्रोलिंगनंतर स्वराचं आणखी एक ट्विट-

सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग पाहता स्वराने आणखी एक ट्विट करत हिंदू धर्म काय शिकवण देतो, याबद्दल लिहिलं. 'परोपकाराय फलन्ति वृक्षा: परोपकाराय वहन्ति नद्य:, परोपकाराय दुहन्ति गाव: परोपकारार्थम् इदं शरीरम्', या ओळी तिने पोस्ट केल्या आहेत. 'इतरांसाठी वृक्ष फळं देतात, तर परोपकारासाठीच नद्या वाहतात. इतरांसाठी गाई दूध देते आणि इतरांच्या मदतीसाठीच माणसाचं शरीर बनलं आहे', असा त्या ओळींचा अर्थ तिने पुढे सांगितला आहे.

'इतर धर्मिच्यांच्या भावना दुखावण्याची शिकवण मला हिंदू धर्म देत नाही. जेव्हा मी काही गुंडांना माझ्या देवाच्या नावाचा (श्री राम) वापर करत शांततेने प्रार्थना करणाऱ्या इतर धर्मियांच्या लोकांना त्रास देताना पाहते, तेव्हा तो माझ्या देवाचा आणि माझ्या हिंदू धर्माचा अपमान आहे असं मानते. अशा लोकांची मला लाज वाटते. आपल्या देवांच्या आणि आपल्या धर्माच्या नावाखाली ही लोकं जो गुन्हा करत आहेत, ते पाहून मला हिंदू असल्याची लाज वाटते', असं तिने स्पष्ट केलं आहे.

Web Title: Swara Bhasker Ashamed For Being Hindu Expressed Anger As Namaz Again Disrupted In Gurgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..