Chitra Wagh Esakal
मनोरंजन

Chitra Wagh : उर्फीच्या कपडे न घालण्याच्या कारणावर चित्रा वाघ यांनी दिला जालिम उपाय

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. उर्फी असगी कपडे का घालते? याचं कारण सांगितलं आहे. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्याचा उर्फीने फोटोही शेअर केला होता. मात्र, त्यावरून चित्रा वाघ यांनी उर्फीला चांगलंच फटकारलं आहे.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन तिला उत्तर दिलं आहे. आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला डिवचलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फार फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.

उर्फी जावेदने सांगितले की, तिच्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे. तिने पूर्ण कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर तिला पुरळ उठतात. उर्फी म्हणाली, "मी कपडे का घालत नाही, कारण माझी प्रकृती गंभीर आहे. जेव्हा मी पूर्ण कपडे घालते तेव्हा माझे शरीरावर लगेच असे पॅच येतात."

उर्फीने आतपर्यंत तिच्या फॅशनमध्ये मोबाईल, प्लेट, मच्छरदानी, उलटा शर्ट, गोणी, फोटो कॉपी, , सिम कार्ड अशी न संपणारी लिस्टआहे. या सगळ्यांचा वापर करून ड्रेस तयार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : Tiger Shroff Firing Live : टायगर श्रॉफवरील गोळीबाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस आयुक्तांशी चर्चा करत कठोर कारवाईचे आदेश

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT